शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग वापरकर्त्यांना नवीन वर्षात मोठे गिफ्ट! १ फेब्रुवारीपासून 'KYV' ची कटकट संपणार; NHAI चा मोठा निर्णय
2
एक चूक आणि बँक अकाउंट रिकामं! सायबर फसवणूक करणाऱ्यांच्या ५ पद्धती जाणून घ्या अन् काळजी घ्या
3
नैनीतालमध्ये गर्लफ्रेंडसोबत फिरत होता नवरा, अचानक समोर आली बायको; मग जे झालं...
4
१ फेब्रुवारी २०२६ पासून सिगरेट महागणार, कोणत्या Cigarette ची किती वाढणार किंमत?
5
निसर्गाचा कोप! अफगाणिस्तानात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार; १७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील ५ जण गाडले गेले
6
Indian Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,४२० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
7
२०२६चा पहिला गजकेसरी राजयोग: ८ राशींना सुबत्ता, पद-पैसा वाढ; लक्षणीय यश, ३ दिवस वरदान काळ!
8
एअर इंडियाच्या पायलटचा कॅनडात 'हायव्होल्टेज' ड्रामा; उड्डाणापूर्वीच झिंगला, मग जे घडलं ते धक्कादायक!
9
२०२६ची पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी: ३ गोष्टी करा, बाप्पा संकट दूर करेल; सगळे मनासारखे होईल!
10
कर महसुलात महाराष्ट्रच ‘किंग’; देशाच्या एकूण तिजोरीत २२% वाटा एकट्या महाराष्ट्राचा
11
‘फॅमिली फर्स्ट’! शिंदेसेनेच्या मुंबईतील उमेदवारांत नेत्यांच्या नातेवाईकांचाच भरणा; माजी आमदार चक्क नगरसेवक पदासाठी रिंगणात 
12
कर्जाच्या जाळ्यात अडकली तरुणाई, विना गॅरंटी कर्जाची थकबाकी वाढतेय; बँकांवर ताण - आरबीआय
13
फडणवीस-शिंदे यांचा उद्या मुंबईत संयुक्त मेळावा, मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फुटणार
14
ग्रंथदिंडीतून साहित्याचा जागर; तब्बल ५६ चित्ररथांच्या दोन किलोमीटर ग्रंथदिंडीने फेडले डोळ्याचे पारणे
15
आजचे राशीभविष्य २ जानेवारी २०२६ : नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आजचा मुहूर्त उत्तम
16
महापालिका निवडणूक : मिशन 'थंड'खोरी! आमचे काय चुकले..? निष्ठावंतांचा सवाल
17
बंडोबांना थंड करून बिनविरोध निवडीचा नवा फंडा; मांडवली, पदांचे आमिष नाहीतर...; काही बंडखोर अज्ञात स्थळी रवाना 
18
‘मी कुठे चुकले, प्रश्न विचारण्याचा मला हक्क’; भाजपच्या इच्छुक उमेदवाराचा घरचा आहेर
19
‘शिंदेसेनेचे उमेदवार बिनविरोध यावे म्हणून विरोधकांचे उमेदवारी अर्ज करताहेत बाद’
20
मला मराठीचा आदर, मुंबईचा महापौर मराठीच होणार; भाजपनेते कृपाशंकर सिंह यांनी अखेर नमते घेतले
Daily Top 2Weekly Top 5

विठू नामाच्या गजराने दुमदुमली रजत नगरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 15:51 IST

खामगाव :  ‘गुरूपावली’ महासोहळ्याच्या निमित्ताने विदर्भाच्या कानाकोपºयातून आलेल्या वारकºयांमुळे खामगाव शहर हे शुक्रवारी प्रतिपंढरपूर बनल्याचा प्रत्यय आला.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  ‘गुरूपावली’ महासोहळ्याच्या निमित्ताने विदर्भाच्या कानाकोपºयातून आलेल्या वारकºयांमुळे खामगाव शहर हे शुक्रवारी प्रतिपंढरपूर बनल्याचा प्रत्यय आला. कृषी उत्पन्न बाजार समितीतून सुरू झालेल्या महादिंडीत विठूनामाचा गजर करीत वारकरी भक्तीत रममान झाले होते.दुपारी २ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीतून या दिंडीला सुरूवात झाली. त्यानंतर शहराच्या विविध मार्गावरून मार्गक्रमण करीत ही दिंडी गुरूपावली सोहळ्याच्या ठिकाणी श्रीश्री धाम शेगाव रोड येथे पोहोचली. शहराच्या विविध मार्गावर या महादिंडीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. या दिंडीचे एक टोक फरशीवर तर दुसरे टोक विकमशी चौकात होते.  कृषी उत्पन्न बाजार समिती, टिळक पुतळा, महावीर चौक, फरशी, भगतसिंह चौक, अग्रसेन चौक, गांधी बगीचा, शहर पोलिस स्टेशन, बस स्टॅन्ड मार्गे ही दिंडी शेगावरोड कडे मार्गस्थ झाली. सुमारे सात हजार वारकरी आणि भाविकांचा या दिडींत सहभाग होता.  आ. आकाश फुंडकर, आ. चैनसुख संचेती यांनीही दिंडीत सहभाग घेतला.  दिंडीतील व्यवस्था आणि पार्कींगची जबाबदारी बजरंगदलाचे अ‍ॅड. अमोल अंधारे यांनी घेतली होती.  या दिंडीत अनेक वारकºयांसोबतच महिला वारकरी आणि भाविक मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते. तुळशीवृंदावनधारी महिला वारकरी सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. दिंडी दरम्यान चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. (प्रतिनिधी)

टॅग्स :khamgaonखामगावspiritualअध्यात्मिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम