परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता धूसर

By Admin | Updated: October 23, 2014 00:13 IST2014-10-23T00:13:42+5:302014-10-23T00:13:42+5:30

विधानसभेसाठी उमेदवारी प्राप्त न होऊ शकलेल्या नेत्यांची विधान परिषदेची वाट बिकट.

The chances of getting the council closed | परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता धूसर

परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता धूसर

बुलडाणा : विधानसभा निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उमेदवारी न मिळालेल्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. ही नाराजी दूर करण्यासाठी या नेत्यांना पक्षाचे काम करा, तुमचा विधान परिषदेसाठी विचार करू, असा सल्ला व आश्‍वासन पक्षश्रेष्ठींनी दिले होते. मात्र निकालानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या पक्षांना मिळालेले यश लक्षात घेता असे आश्‍वासन पूर्ण करणे पक्षप्रमुखांना शक्य दिसत नाही. त्यामुळे विधानपरिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता धूसर झाली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये काँग्रेस ४२, राष्ट्रवादी ४१ व शिवसेना ६३ जागा जिंकली. ही संख्या पाहता विधानपरिषदेवर या पक्षांपैकी प्रत्येकी १ किंवा २ एवढेच सदस्य जाऊ शकतात. निकालामध्ये अनेक दिग्गजांचा पराभव झाल्यामुळे त्यांना राजकीय पुनजिर्वन देण्यासाठी विधानपरिषदेचा विचार केला जाईल व त्यांनाच प्राधान्य मिळेल. त्यामुळे विविध मतदारसंघात एमएलसीसाठी शब्द घेणार्‍या नेत्यांना आता विधानपरिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता धूसर झाली आहे. विधानसभेतील किमान ३0 जागांमागे एक विधानपरिषदेचा आमदार असे साधारणपणे सूत्र असते. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्याही अनेक नेत्यांना विश्रांती घेण्याशिवाय पर्याय नाही.


*घटकपक्षांची गोची
महायुतीतील घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना व रिपाइं आठवले गट या पक्षाच्या नेत्यांना विधानपरिषदेचे आश्‍वासन देण्यात आले होते. मात्र या दोन्ही पक्षांची विधानसभेतील एकूण कामगिरी लक्षात घेता या पक्षांनाही विधानपरिषदेवर घेतल्या जाण्याची शक्यता नाही.


*आचारसंहिता संपली
विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने लावलेली आचारसंहिता २२ ऑक्टोबरच्या संध्याकाळी संपली. त्यामुळे प्रशासकीय स्तरावर निर्णय घेण्यासाठी आता मोकळीक मिळाली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर दुसर्‍याच दिवशी राजकीय पदाधिकार्‍यांना त्यांची वाहने परत देण्यात आली.

Web Title: The chances of getting the council closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.