पावसाने गाठली चाळिशी

By Admin | Updated: August 26, 2014 23:43 IST2014-08-26T22:24:57+5:302014-08-26T23:43:48+5:30

पावसाचे आगमन : मोताळा तालुका अजूनही अवर्षणग्रस्तच

Chalishi reached by rain | पावसाने गाठली चाळिशी

पावसाने गाठली चाळिशी

बुलडाणा : जिल्ह्यात महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाने २३ जुलैपासून आगमन केल्याने आतापर्यंंत ३३ टक्क्यांपर्यंत असलेल्या पावसाने फक्त चाळिशीच गाठली आहे. जिल्ह्यात आज २५ जुलै रोजी सकाळी आठ वाजेपर्यंंत नोंदविलेला पाऊस हा ४१ टक्के झाला असून, अजूनही ६0 टक्के पावसाचा बॅकलॉग बाकी आहे. तब्बल एक महिन्यापासून रोज ज्याची वाट पाहणे सुरू होते तो पाऊस अखेर बरसला. जिल्ह्याभरात गत पाच दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा दिला आहे. २१ ऑगस्ट बुधवारच्या रात्रीपासून बुलडाणा शहरासह जिल्हय़ात सर्वत्र ढगाळ वातावरणामुळे पाऊस येण्याची चाहूल लागली होती. तोच गुरुवारी २१ ऑगस्ट रोजी दुपारी पावसाची हजेरी लागली. २१ ऑगस्टच्या पावसाची ४४ मि.मी. एवढी नोंद करण्यात आली. तर २२ ऑगस्ट रोजी १७५ मी.मी., २३ ऑगस्ट रोजी १५३ मि.मी. तर २४ ऑगस्ट रोजी २९३ मि.मी. करण्यात आली. १९ आणि २0 ऑगस्ट रोजी चिखली, मोताळा, ज.जामोद, सिंदखेडराजा तालुक्यातील ४४ मि.मी. एवढाच पाऊस पडला. इतर तालुक्यांमध्ये मात्र पावसाचा आकडा निरंकच होता. मोताळा तालुक्यामध्ये ५0 हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. पेरणीमध्ये कापूस व सोयाबीन पिकाचा पेरा जास्त आहे. तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे पिकांची पुरेशी वाढ झालेली नाही. त्यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे मोताळा तालुका अजूनही अवर्षनग्रस्तच आहे. या पाच दिवसातील पावसाची सरासरी ४१ टक्के नोंदविण्यात आली. १ जून ते ३१ ऑक्टोबर दरम्यान ७१२.६७ सरासरी एवढा पाऊस अपेक्षित असतो; मात्र यंदा ३८४६.६६ मि.मी. एवढाच पाऊस पडला. ज्याची सरासरी २९५ टक्के नोंदविली गेली. गेल्या चार वर्षांपासून दुष्काळाची छळ सोसलेल्या बुलडाणा जिल्ह्यात गत वर्षी २0१३ मध्ये ९७३३.७५ मि.मी. पाऊस पडला. ज्याची ७५१ टक्के सरासरीने गेल्या दहा वर्षांचा विक्रम मोडला होता. २५ ऑगस्ट रोजी बुलडाणा तालुक्यात 0५ मि.मी., दे.राजामध्ये 0३ मि.मी., मेहकरमध्ये १२ मि.मी., लोणारमध्ये ३३ मि.मी., मलकापूर 0२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. शिवाय चिखली, सिंदखेडराजा, मोताळा, नांदुरा, खामगाव, शेगाव, ज.जमोद, संग्रामपूरमध्ये पावसाचा आकडा निरंक राहिला. अजूनही ६0 टक्के बॅकलॉग भरुन काढणे गरजेचे आहे.

** गत तीन ते चार दिवसांपासून बुलडाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस होत आहे; मात्र मेहकर, लोणार व सिंदखेडराजा तालुक्यात अद्यापपर्यंंत दमदार पाऊस झाला नसल्याने सोयाबीन पीक धोक्यात आले आहे. तालुक्यातील सावत्रा, सोनारगव्हाण, सुळा, भालेगाव, पाचला, मोसंबेवाडी, मिस्कीनवाडी यासह परिसरात अत्यल्प पाऊस असल्याने खरीप पिके सुकू लागली आहेत, तर पावसाने दडी मारल्यामुळे किनगावजट्ट, भुमराळा, सावरगाव तेली, वसंतनगर, देवानगर, खापरखेड लाड, या परिसरावर कोरड्या दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. शेतकर्‍यांनी सोयाबीन, उडीद, मूग, कपाशीची पेरणी केली; परंतु पावसाच्या हुलकावणीमुळे अनेक शेतकर्‍यांवर दुबार ते तिबार पेरणीची वेळ आली आहे. कनका परिसरात पावसाने दडी मारल्यामुळे येथील हायब्रीड ज्वारीची पिके सुकू लागली आहेत. जानेफळ शिवारात पावसाअभावी हवेत डोलणार्‍या पिकांनीही माना खाली घातल्या आहेत.

Web Title: Chalishi reached by rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.