पैशाच्या वादातून युवकावर चाकुहल्ला

By Admin | Updated: March 20, 2015 00:51 IST2015-03-20T00:51:36+5:302015-03-20T00:51:36+5:30

मजुरीचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या युवकावर चाकुहल्ला.

Chakahalla on the young man's promise of money | पैशाच्या वादातून युवकावर चाकुहल्ला

पैशाच्या वादातून युवकावर चाकुहल्ला

धाड (जि. बुलडाणा) : मजुरीचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या युवकावर चाकुहल्ला झाला. यामध्ये सदर युवक जखमी झाल्याची घटना नजिकच्या मढ शिवारात १९ मार्चच्या सकाळी ८.३0 वाजेच्या सुमारास घडली. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात येणार्‍या जाळीचा देव येथील अनिल गोविंदराव लुटे(२७)हा आपल्या मजुरीचे पैसे मागण्यासाठी मढ येथील विजय देवचंद बालोद (४२) याच्याकडे सकाळी गेला. या दरम्यान दोघांमध्ये वाद होऊन विजय बालोद याने अनिल लुटे याच्या काठीने हल्ला करून चाकुने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अनिलला नागरिकांनी तत्काळ बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.

Web Title: Chakahalla on the young man's promise of money