पंचायत राज समितीच्या अध्यक्षांनी दिली लोणार सरोवराला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:39 IST2021-09-12T04:39:36+5:302021-09-12T04:39:36+5:30
यावेळी लोणार नगरपरिषदेचे गटनेते भूषण मापारी यांनी त्यांना सरोवर व परिसर या ठिकाणी नेऊन संपूर्ण माहिती दिली. तसेच पवित्र ...

पंचायत राज समितीच्या अध्यक्षांनी दिली लोणार सरोवराला भेट
यावेळी लोणार नगरपरिषदेचे गटनेते भूषण मापारी यांनी त्यांना सरोवर व परिसर या ठिकाणी नेऊन संपूर्ण माहिती दिली. तसेच पवित्र अशा धारतीर्थ तसेच ऐतिहासिक असे दैत्यसुदन मंदिर येथेसुद्धा त्यांनी भेट दिली. या मंदिराच्या ऐतिहासिक इतिहासाबद्दल माहितीकार आनंद मिश्रा यांनी सखोल माहिती दिली. तसेच या मंदिराच्या शिल्पाबद्दल संपूर्ण माहिती सांगितली. यावेळी त्यांना लोणार शहर व परिसर नयनरम्य असल्याचे सांगितले. लवकरच काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांना याबद्दल माहिती देऊन त्यांनासुद्धा लोणारला आणण्याचा प्रयत्न करू असे यावेळी सांगितले. यानंतर लोणार नगरपरिषदेचे गटनेते भूषण मापारी तसेच कमळजा अर्बनच्या अध्यक्षा मीराताई मापारी यांनी हर्षवर्धन सपकाळ याचा सपत्नीक सत्कार केला. यावेळी नगरसेवक संतोष मापारी, काँग्रेस नेते गुलाबराव सरदार, सतीश राठोड, उबेद खान पठाण, शेख समद शेख अहमद, संजय चव्हाण, मोसीन शहा, शेख जुनेद शेख करामत आदी उपस्थित होते.