शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांमुळे तापमान वाढले - पंजाबराव डख पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 19:23 IST

Cement concrete roads raise temperature : सिमेंटचे रस्ते बनल्याने तापमान वाढले आणि एकूणच निसर्गाचा समतोल बिघडला.

 -   नानासाहेब कांडलकरजळगाव जामोद :पूर्वी पाऊस येण्याचे काही ठोकताळे होते.शेतकरी वर्ग त्यानुसार पेरणी करीत असे आणि त्या वेळी शेतकर्‍यांनी अंदाज केल्याप्रमाणे पाऊस बरसत असे.काळाच्या ओघात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली,सिमेंटचे रस्ते बनल्याने तापमान वाढले आणि एकूणच निसर्गाचा समतोल बिघडला.त्यामुळे एकीकडे कोरडा दुष्काळ तर दुसरीकडे ढगफुटीच्या प्रमाणात वाढ असे विसंगत चित्र निर्माण झाले आहे. असे असले तरी शेतकऱ्यांनी आपले जुने तंत्र वापरावे असे आवाहन हवामानाचे अभ्यासक पंजाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांना केले.        श्री संत सखाराम महाराज संस्थान इलोरा येथे हवामानातील बदल व पाऊस पाणी याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना ते म्हणाले पाऊस येण्याची काही लक्षणे आहेत.दिवस मावळत असतांना आकाश तांबडे झाले तर 72 तासात पाऊस येतो.गर्मी वाढल्यास बहात्तर तासात पाऊस येण्याची शक्यता असते तसेच चिमण्यांनी धुळीत आंघोळ केल्यास 72 तासात पाऊस येतो.जेव्हा पावसाचे ढग वाहतांना विमानासारखा आवाज येतो तेव्हा पाऊस येणार असे निश्चित समजावे. कावळ्याने आपले घरटे झाडाच्या शेंड्यावर केल्यास समजावे की यावर्षी पावसाळा कमी होणार आहे, झाडाच्या मध्यभागी केल्यास समजावे पावसाळा जास्त होणार आहे.उन्हाळ्यात 15 मे ते 30 मे दरम्यान पाऊस झाल्यास पेरणी योग्य पाऊस वेळेवर होईल असा अंदाज व्यक्त करावा,असे काही ठोकताळे पंजाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले.

गारपीट होण्याची स्थिती साधारणपणे 22 फेब्रुवारी ते 10 मार्च या दरम्यान गारपीट होते.42 हजार 260 गावांपैकी फक्त शंभर गावांमध्ये गारपीट होते.जिथेडोंगराळ भाग आहे व धरण आहे तेथे गारपीट मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्‍यता असते.काळ्या कसदार जमिनीत शक्यतोवर गारपीट होत नाही.15 मे ते 30 मे च्या दरम्यान वीज पडण्याचे प्रमाण जास्त असते. साधारणपणे नारळाचे झाड,आंब्याचे झाड, मंदिराचा कळस व जनावरे यावर व वीज पडण्याचे प्रमाण मोठे असते.वीज पडतांना लाकडावर किंवा गवताच्या पेंडी वर उभे राहिल्यास अंगावर वीज पडण्याचा धोका टळतो.

टॅग्स :buldhanaबुलडाणाJalgaon Jamodजळगाव जामोदweatherहवामानenvironmentपर्यावरण