मोहाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:23 IST2021-02-22T04:23:03+5:302021-02-22T04:23:03+5:30

याप्रसंगी त्यांच्या प्रतिमेचे पूजन वाचनालयाचे उपाध्यक्ष शिवाजी रिंढे यांनी केले. यावेळी वाचनालयाचे ग्रंथपाल ऋषिकेश रिंढे यांनी छत्रपती ...

Celebration of Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti at Mohadi | मोहाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

मोहाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

याप्रसंगी त्यांच्या प्रतिमेचे पूजन वाचनालयाचे उपाध्यक्ष शिवाजी रिंढे यांनी केले. यावेळी वाचनालयाचे ग्रंथपाल ऋषिकेश रिंढे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाच्या सचिव मालता रिंढे ह्या होत्या. कार्यक्रमास माजी सरपंच विनायक रिंढे, जिल्हा महासचिव संदीप इंगळे, परमेश्वर रिंढे, विलास आबा रिंढे आदी उपस्थित होते. कोरोनाचे पालन करून शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी वाचनालय सचिव मालता रिंढे, रमेश रिंढे, प्रतीक रिंढे, प्रशांत रिंढे, भुजंगराव रिंढे, प्रवीण रिंढे, सतीश इंगळे, सुहास इंगळे, नितीन इंगळे, मंगेश खंड वाचनालयाचे सर्व कार्यकारी व कर्मचारी मंडळ तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रंथपाल ऋषिकेश रिंढे यांनी आभार मानले.

Web Title: Celebration of Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti at Mohadi