'स्वाभिमानी' कार्यकर्त्यांंचा जल्लोष
By Admin | Updated: July 9, 2016 00:13 IST2016-07-09T00:13:50+5:302016-07-09T00:13:50+5:30
सदाभाऊ खोत यांची राज्य मंत्रीमंडळात वर्णी लागल्यामुळे कार्यकत्यांमध्ये उत्साह.

'स्वाभिमानी' कार्यकर्त्यांंचा जल्लोष
बुलडाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आ.सदाभाऊ खोत यांची राज्य मंत्रीमंडळात वर्णी लागल्याने ८ जुलै रोजी सकाळी ९.३0 वाजता बुलडाण्यात अनेक ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांंनी जल्लोष केला. संघटनेच्या कार्यकर्त्यांंनी शहरातील संगम चौक व जयस्तंभ चौक आदी ठिकाणी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. यावेळी संतोष राजपूत, डॉ.विनायक वाघ, गजानन उबरहंडे, महेंद्र जाधव, नितीन हिवाळे, प्रदीप शेळके, आकाश माळोदे, कडूबा मोरे, रामदास ससाने, डॉ. भानुदास जगताप, श्रीकृष्ण जगताप, गंगाधर तायडे, दत्तात्रय जेऊघाले, केशवराव जेऊघाले, सदा पाटील, नितीन राजपूत यांच्यासह उपस्थित होते.