बालिका दिवस साजरा करणे काळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:36 IST2021-02-05T08:36:24+5:302021-02-05T08:36:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : जगातील लोकसंख्येच्या १५ टक्के लोकसंख्या ही बालकांची आहे. आजचे बालक हे पुढचे भविष्य आहे. ...

बालिका दिवस साजरा करणे काळाची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जगातील लोकसंख्येच्या १५ टक्के लोकसंख्या ही बालकांची आहे. आजचे बालक हे पुढचे भविष्य आहे. आपण पूर्वी फक्त १४ नोव्हेंबर रोजी बालक दिन साजरा करत आलाे आहोत. परंतु, आजकालच्या युगात बालिका दिनसुध्दा तितक्याच जोमाने साजरा करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश साजिद आरिफ सैय्यद यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलडाणा आणि जिल्हा वकील संघ, बुलडाणा तसेच महिला व बालविकास अधिकारी कार्यालय आणि जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बुलडाणा यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या शिवाजी सभागृहात आयाेजित राष्ट्रीय बालिका दिवस साक्षरता शिबिरात ते बाेलत हाेते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. प्रमोद टाले, अॅड. राहुल दाभाडे, ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. विजयकुमार कस्तुरे आदींनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद रामरामे हाेते. सूत्रसंचालन प्रदीप सपकाळ यांनी केले तर दिवेश मराळे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी अ. ज. ठेंग, ज्ञानेश्वर तिजारे, हेमंत देशमुख यांनी परिश्रम घेतले.