राष्ट्रीय मतदार दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:32 IST2021-02-05T08:32:37+5:302021-02-05T08:32:37+5:30
हा कार्यक्रम एनएसएस व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. आर. जी. ...

राष्ट्रीय मतदार दिन साजरा
हा कार्यक्रम एनएसएस व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. आर. जी. सुरळकर यांनी आपल्या प्रास्ताविकात १९ व्या शतकात वेगवेगळ्या देशात मतदान जागृती कशा पद्धतीने झाली, यासंबंधीची माहिती दिली. याप्रसंगी डॉ. पी. आर. जुनघरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. समारोपीय भाषण प्राचार्य डॉ. बी. आर. लाहोरकर यांनी केले. हा कार्यक्रम कोरोना पार्श्वभूमी लक्षात घेता सुरक्षित अंतर ठेवून राबविण्यात आला. कार्यक्रमाला प्राचार्य बोरकर, डॉ. बी. डब्ल्यू. सोमटकर, प्रा. व्ही. आर. मोरे, प्रा. शेळके, डॉ. खडसे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.डॉ. एस. टी. कुटे यांनी केले. आभार प्रा.डॉ. एम. आर. शिंदे यांनी मानले.