लहान मुलांना गोळ्यांचे वाटप करून जंतनाशक दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:40 IST2021-09-24T04:40:16+5:302021-09-24T04:40:16+5:30

एआयएमएच्या पुरस्कारासाठी डॉ. नीलेश गायकवाड यांची निवड अमडापूर : आरोग्य क्षेत्रात तसेच कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी करून असंख्य रुग्णांवर ...

Celebrate Deworming Day by distributing pills to children | लहान मुलांना गोळ्यांचे वाटप करून जंतनाशक दिन साजरा

लहान मुलांना गोळ्यांचे वाटप करून जंतनाशक दिन साजरा

एआयएमएच्या पुरस्कारासाठी डॉ. नीलेश गायकवाड यांची निवड

अमडापूर : आरोग्य क्षेत्रात तसेच कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी करून असंख्य रुग्णांवर कमी वेळेत यशस्वी उपचार तसेच सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल येथील डॉ. नीलेश गायकवाड यांची एआयएमए पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनच्या वतीने ही निवड करण्यात आली. येत्या २७ सप्टेंबर रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, औरंगाबाद येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

--

पत्रकारास दमदाटी करणाऱ्या पोलिसांना निलंबित करा

मेहकर : चिखली येथील पत्रकार समाधान गाडेकर वृत्तसंकलनासाठी गेले असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दमदाटी व धक्काबुक्की केली. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक नीलेश शेळके व पोलीस कर्मचारी दीपक वायाळ यांच्यावर कारवाई करून निलंबित करण्यात यावे, अशी मागणी मेहकर उपविभागीय अधिकारी गणेश राठोड यांना मेहकर तालुका पत्रकार संघाच्यावतीने करण्यात आली आहे.

Web Title: Celebrate Deworming Day by distributing pills to children