बुलडाणा जिल्हा न्यायालय परीसरावर सीसी कॅमेऱ्यांची ‘नजर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 12:57 PM2020-10-13T12:57:55+5:302020-10-13T12:58:06+5:30

Buldhana District Court न्यायालय परिसरावर आता  सीसी कॅमेऱ्यांचा वाच राहणार आहे. 

CCTV cameras keep an eye on court premises | बुलडाणा जिल्हा न्यायालय परीसरावर सीसी कॅमेऱ्यांची ‘नजर’

बुलडाणा जिल्हा न्यायालय परीसरावर सीसी कॅमेऱ्यांची ‘नजर’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : स्थानिक जिल्हा न्यायालय इमारत व परीसरातील सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणेनेचे उद्घाटन १२ ऑक्टोंबर रोजी जिल्हा न्यायालय येथे करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, जिल्हा न्यायाधीश १ आर. बी रेहपाडे, प्रमुख न्यायदंडाधिकारी एन. आर तळेकर, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आर. एम राठोड, सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर)  एस. डी पंजवानी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव साजीद आरीफ सैय्यद, न्यायालय व्यवस्थापक श्रीमती सुप्रिया देशमुख व जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक व.रा. भारंबे आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी सीसीटीव्ही यंत्रणेची पाहणी केली.  प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन म्हणाले,  सीसी  कॅमेरे बसविल्यामुळे न्यायालयाचे आवारात एक प्रकारचा वचक निर्माण झाला. आवारामध्ये बऱ्याच वेळेस पक्षकाराकडून वकील लोकांना मारहाण करण्याचा प्रकार घडला होता. त्याला आळा बसेल. तसेच आवारातील प्रत्येक व्यक्तीवर, कर्मचारी, वाहने आदींवर लक्ष ठेवण्याचे काम चोख बजाविल्या जात आहे.
या सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याकरीता जिल्हा नियोजन समिती, बुलडाणा तथा जिल्हाधिकारी यांच्याकडून निधी उपलब्ध करण्यात आला होता. याकामी निधी उपलब्ध करून घेण्यापासून ते सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यापर्यंतचे कामासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालय व्यवस्थापक  सुप्रिया देशमुख यांनी प्रयत्न केले.  जिल्हा न्यायालय बुलडाणा व त्याला संलग्न असलेले चिखली, मेहकर, लोणार, शेगांव व मलकापूर येथे जिल्हा नियेाजन समिती तथा जिल्हाधिकारी यांच्या जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत राबविण्यात येणाऱ्या नाविण्यपूर्ण योजनेनुसार सीसी कॅमेरे बसविण्यात आले. हे कॅमेरे एमएसएसआयडीसी, मुंबई यांच्यामार्फत कार्यान्वीत करण्यात आले. यासाठी जिल्हाधिकारी, बुलडाणा यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. न्यायालय परिसरावर आता  सीसी कॅमेऱ्यांचा वाच राहणार आहे. 

Web Title: CCTV cameras keep an eye on court premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.