सीसी कॅमेरा लंपास

By Admin | Updated: June 26, 2015 01:32 IST2015-06-26T01:32:25+5:302015-06-26T01:32:25+5:30

खामगावातील घटना.

CC Camera Lampas | सीसी कॅमेरा लंपास

सीसी कॅमेरा लंपास

खामगाव : चोरट्यांवर नजर ठेवण्यासाठी लावण्यात आलेले सीसी कॅमेरेच चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. येथील बाजार समितीच्या तेजपाल नवलचंद ट्रेडर्स या टिनपत्र्यांच्या दुकानातून चोरट्याने चक्क कॅबीनमध्ये बसवलेले सीसीटीव्ही कॅमेर्‍याची स्क्रीनच लंपास केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. छतावरील फायबरचा टीन कापून चोरट्यांनी आत प्रवेश केला व दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याची वायर तोडून रेकॉर्डींग करणारी स्क्रीन (डीव्हीआर बॉक्स) लंपास केली. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत अतुल तेजपाल शहा यांनी शहर पोलीस ठाण्याला तक्रार दिली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वीही शहरातून सीसीटीव्ही लंपास झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत.

Web Title: CC Camera Lampas