काेविशिल्डचा ८४ दिवसांनी मिळणार दुसरा डाेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:35 IST2021-05-19T04:35:37+5:302021-05-19T04:35:37+5:30

अमडापुर : प्राथमिक आराेग्य केंद्रात काेराेना लसीकरण करण्यात येत आहे़ केंद्र शासनाच्या नवीन नियमानुसार काेविशिल्ड लसीचा दुसरा डाेस ...

The Cavshield will get its second Dass in 84 days | काेविशिल्डचा ८४ दिवसांनी मिळणार दुसरा डाेस

काेविशिल्डचा ८४ दिवसांनी मिळणार दुसरा डाेस

अमडापुर : प्राथमिक आराेग्य केंद्रात काेराेना लसीकरण करण्यात येत आहे़ केंद्र शासनाच्या नवीन नियमानुसार काेविशिल्ड लसीचा दुसरा डाेस ८४ दिवसांनी देण्यात येणार असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे़

कोविड लसीकरण जिल्हा स्तरावर प्राप्त साठ्यानुसार अमडापूर प्राथमिक आराेग्य केंद्रात नियोजनबध्द पद्धतीने सुरु आहे़ केंद्रशासनाच्या १३ मे २०२१ च्या नियमानुसार कोविशिल्ड लसीच्या अंतरामध्ये बदल करण्यात आला आहे़ पहिला डाेस घेल्यानंतर दुसरा डोस ६ ते ८ आठवड्यांनंतर घेता येत होता़ परंतु आता दुसरा डोज १२ ते १६ आठवड्यांनंतर ८४ दिवसांनी मिळणार आहे़ लसीकरण केंद्रावर ग्रामस्थांनी गर्दी करू नये, असे आवाहन डॉ. देवेंद्र बावस्कर, सुनील हमेले ,अनिल लोखंडे आरोग्य सहायक यांनी केले आहे़

Web Title: The Cavshield will get its second Dass in 84 days