ओबीसींची जातनिहाय जनगणना लवकर करावी, अन्यथा तीव्र आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:39 IST2021-08-21T04:39:07+5:302021-08-21T04:39:07+5:30

स्थानिक पत्रकार भवन येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. यावेळी गोर सेनेच्या वतीने मागील चार दिवसांपासून ...

Caste wise census of OBCs should be done early, otherwise intense agitation | ओबीसींची जातनिहाय जनगणना लवकर करावी, अन्यथा तीव्र आंदोलन

ओबीसींची जातनिहाय जनगणना लवकर करावी, अन्यथा तीव्र आंदोलन

स्थानिक पत्रकार भवन येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. यावेळी गोर सेनेच्या वतीने मागील चार दिवसांपासून

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. या साखळी उपोषणाचा आज चौथा दिवस उजाडला आहे. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. यावेळी संदेश चव्हाण म्हणाले की, स्थानिक

स्वराज्य संस्थांमधील धोक्यात आलेले ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी राज्य सरकारने तत्काळ कार्यवाही करावी. मागासवर्गीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करावे, ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, नवी मुंबई विमानतळाला वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात यावे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आयुक्त पूर्व परीक्षेचे सर्व परीक्षेचे वेळापत्रक तत्काळ जाहीर करावे, बार्टीच्या धरतीवर महाज्योतीला तीन हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना सुुरू करून जिल्हाध्यक्षांची नेमणूक तत्काळ करावी, यूजीसीच्या निर्देशानुसार समर्थ आरक्षण कायदा २०१९ लागू करून महाविद्यालय व विद्यापीठ एकक मानून प्राध्यापक भरती सुरू करावी, नोव्हेंबर २००५ पासून सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवा नियुक्त अधिनियमन १९८२-८४ ची जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीकडे शासनाने दुर्लक्ष केल्यास गोर सेनेच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. सद्य:स्थितीत सेनेच्या वतीने राज्यातील २० पेक्षा अधिक जिल्हा अधिकारी कार्यालयांसमोर याच मागणीसाठी साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणाला विविध स्तरावर पाठिंबा देण्यात येत असल्याची माहिती संदेश चव्हाण यांनी दिली. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये अमरावतीचे विभागी अध्यक्ष सोनू चव्हाण, बुलडाणा जिल्हाध्यक्ष प्रल्हाद राठोड, बुलडाणा जिल्हा उपाध्यक्ष अंकुश राठोड, अखिल भारतीय चर्मकार संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष डॉ. डी.आर. माळी, बुलडाणा तालुका अध्यक्ष प्रमोद राठोड, तालुका सचिव विशाल जाधव, मोताळा तालुका प्रसिद्धीप्रमुख विशाल राठोड आदींची उपस्थिती होती.

Web Title: Caste wise census of OBCs should be done early, otherwise intense agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.