विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By Admin | Updated: December 14, 2015 02:22 IST2015-12-14T02:22:09+5:302015-12-14T02:22:09+5:30
छळाला कंटाळून विवाहितेने विषारी औषध घेऊन केली होती आत्महत्या.

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
मोताळा (जि. बुलडाणा) : माहेरहून पैसे आणण्यासाठी छळ करून विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या तक्रारीवरून सासरच्या चार जणांविरुद्ध १३ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. मेहकर तालुक्यातील इसवी येथील रहिवासी त्र्यंबक पुंडलिक खंडारे (७३) यांच्या तक्रारीनुसार, त्यांची मुलगी कल्पना हिचा विवाह कोथळी येथील गजानन सरकाटे याच्यासोबत झाला होता. छळाला कंटाळून कल्पना हिने १३ डिसेंबरच्या सकाळी विषारी औषध प्राशन केले. यामध्ये तिचा मृत्यू झाला. सासरच्या चार मंडळींनी विवाहि तेस आत्महत्येस प्रवृत्त केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून पोलिसांनी पती गजानन सरकाटे, सासरा रामधन सरकाटे, सासू कासाबाई सरकाटे व नणंद कांताबाई सरकाटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.