आकडे टाकून घरात ‘उजेड’ करणाऱ्यांना महावितरणचा ‘झटका’
By भगवान वानखेडे | Updated: March 16, 2023 19:02 IST2023-03-16T19:02:18+5:302023-03-16T19:02:31+5:30
वीज चोरी केल्या प्रकरणी १२ जणाविरुद्ध शहर ठाण्यात गुन्हा दाखल.

आकडे टाकून घरात ‘उजेड’ करणाऱ्यांना महावितरणचा ‘झटका’
बुलढाणा : अकोडे टाकून आणि मीटरमध्ये जुगाड करून वीज चोरी करुन घरात प्रकाश आणणाऱ्या वीज चोरांना शोधून काढण्यासाठी महावितरणकडून विशेष मोहीम राबविल्या जात आहे. या वीज चोरावर दंडात्मक कारवाई तसेच पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येत असून, दरम्यान देऊळगाव राजा तालुक्यातील १२ वीज चोरांवर बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई १६ मार्च रोजी करण्यात आली.
देऊळगाव राजामधील महावितरणचे सहाय्यक अभियंता आकाश बाळकृष्ण तायडे १६ मार्च रोजी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर वीज चोरी केल्याप्रकरणी राम श्याम खांडेभराड, बाळासाहेब लक्ष्मण बरगे, येडूजी जानोजी म्हस्के (तिघे, रा. कुंभारी,ता. देऊळगाव राजा), किसन संतोष शेळके, चंद्रभागा माधव वायाळ (दोघे रा. असोला जहाॅंगीर), शिवनाथ एकनाथ राऊत, रामेश्वर संतोष म्हस्के, एकनाथ सिताराम म्हस्के, समाधान बापूराव झीने, बाबासाहेब सिताराम म्हस्के, हरिदास पंढरीनाथ म्हस्के आणि जगन रघुनाथ म्हस्के (सर्व रा. गिरोली खुर्द, ता.देऊळगाव राजा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वीज चोरी थांबवण्यासाठी राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत डिसेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत या १२ जणांवर कारवाई करण्यात आली होती. त्यांच्या घरात वीज चोरीसाठी वापरण्यात आलेला केबलसुद्धा पथकाने जप्त केले होते.