पिंप्री माळी येथील बैलजाेडी गेली वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:24 IST2021-06-25T04:24:52+5:302021-06-25T04:24:52+5:30

पिंप्रीमाळी परिसरात बुधवारी सायंकाळी जाेरदार पाऊस झाला. त्यामुळे नाल्याला पूर आला हाेता़. शेतातील कामे संपल्यानंतर सुरेश इंगळे हे ...

Carrying the bullock cart at Pimpri Mali | पिंप्री माळी येथील बैलजाेडी गेली वाहून

पिंप्री माळी येथील बैलजाेडी गेली वाहून

पिंप्रीमाळी परिसरात बुधवारी सायंकाळी जाेरदार पाऊस झाला. त्यामुळे नाल्याला पूर आला हाेता़. शेतातील कामे संपल्यानंतर सुरेश इंगळे हे बैलगाडीने घराकडे परत जात हाेेते. नाल्यातून जात असताना पुराचे पाणी वाढले. त्यामुळे बैलगाडी वाहून गेली़. सुरेश इंगळे व इतर महिलांनी आपला जीव वाचवला आहे. दाेन बैलांपैकी एक बैल समृद्धी महामार्गाच्या फरदापूर येथील खटकाळीच्या नाल्यामध्ये गुरुवारी सकाळी आढळला़, दुसरा बैल अद्याप सापडला नसून, त्याचा शोध सुरू आहे. समृद्धी महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे खटकाळीच्या नाल्याला मोठा पूर येत आहे. अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी थांबून लाखो रुपयांचे शेती व पिकांचे नुकसान होत असून, समृद्धी महामार्गाच्या ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष हाेत आहे.

Web Title: Carrying the bullock cart at Pimpri Mali