लाेणारमध्ये ४०० जणांना दिली काेराेना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:31 IST2021-02-05T08:31:52+5:302021-02-05T08:31:52+5:30
या सर्व लाभार्थींना लसीमुळे कुठलाही त्रास झाला नसून ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे प्रतिपादन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ...

लाेणारमध्ये ४०० जणांना दिली काेराेना लस
या सर्व लाभार्थींना लसीमुळे कुठलाही त्रास झाला नसून ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे प्रतिपादन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किसन राठोड यांनी स्वतः लस घेतल्यानंतर केले. कोरोना लसीकरणाविषयी सुरुवातीला काही भ्रामक गोष्टी फैलावल्या गेल्यामुळे या लसीकरणाला कसा प्रतिसाद* मिळणार याविषयी सर्वत्र कुतूहल निर्माण झाले होते. परंतु या लसाकरणला तालुक्यात मिळत असलेला उदंड प्रतिसाद* बघता ही मोहीम नक्कीच यशस्वी ठरत आहे, अशी भावना डॉ. विक्रांत मापारी तालुका अध्यक्ष डेंटिस्ट असोसिएशन लोणार यांनी लस घेतल्यानंतर व्यक्त केली. लसीकरणासाठी प्रा. आ. केंद्रात अतिशय चांगल्या सुविधा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. लसीकरण कॅम्पसाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किसन राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रल्हाद जायभाये, कोविड सेंटर व्यवस्थापक डॉ.भास्कर मापारी, जि.प.च्या माजी सभापती आशाताई झोरे, डेंटिस्ट असोसिएशन अध्यक्ष डॉ.विक्रांत मापारी , राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष सदानंद तेजनकर, सुमन पवार, अधिपरिचारिका सुनंदा ठाकूर , आरोग्य विभागाचे राजेंद्र रिंढे उपस्थित होते.