जंतनाशक गाेळ्या वाटप माेहिमेला काेराेनाचा अडसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:05 IST2021-03-04T05:05:47+5:302021-03-04T05:05:47+5:30
बुलडाणा : आतड्यांचा कृमी राेग टाळण्यासाठी दरवर्षी आराेग्य विभागाच्या वतीने ०१ ते १९ वर्षे वयोगटांतील मुला-मुलींना जंतनाशक गाेळ्यांचे वितरण ...

जंतनाशक गाेळ्या वाटप माेहिमेला काेराेनाचा अडसर
बुलडाणा : आतड्यांचा कृमी राेग टाळण्यासाठी दरवर्षी आराेग्य विभागाच्या वतीने ०१ ते १९ वर्षे वयोगटांतील मुला-मुलींना जंतनाशक गाेळ्यांचे वितरण करण्यात येते. यावर्षी काेराेना संसर्ग वाढत असल्याने शाळा बंदच आहेत. त्यामुळे, आराेग्य विभागाने १ मार्च राेजी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन गाेळ्यांचे वाटप केले. आशा स्वयंसेविकांच्या वतीने गाेळ्यांचे वितरण करण्यात आले.
एक ते १९ वर्षे वयोगटातील किमान ६८ टक्के बालकांमध्ये आढळणारा आतड्याचा कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतूंमुळे होतो. हाच कृमीदोष रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण ठरतो. त्यामुळे त्यांना जंतनाशक गोळ्या दिल्या जात आहेत. कोरोना संसर्गामुळे अंगणवाडी, शाळा बंद असल्याने, सर्व मुला-मुलींना अंगणवाडी सेविका व आशासेविका यांच्याद्वारे जिल्ह्यातील ७ लाख ०२ हजार ७३० विद्यार्थ्यांना गाेळ्यांचे वाटप करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये ०१ ते ०६ वर्षे वयाेगटातील १ लाख २३ हजार ४७९, तर ०७ ते १९ वर्षे या वयाेगटातील ५ लाख ८० हजार ६५६ लाभार्थ्यांचा समावेश आहे.
शाळा बंद असल्याने अडचणींचा डाेंगर
दरवर्षी शाळा सुरू राहत असल्याने जंतनाशक गाेळ्यांचे वितरण शाळेतूनच हाेत हाेते. मात्र, यावर्षी काेराेना संसर्ग वाढत असल्याने शाळा, महाविद्यालये बंद असल्याने गाेळ्यांचे वितरण करण्यासाठी आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांना कसरत करावी लागत आहे. ग्रामीण भागातही काेराेना रुग्ण वाढत असल्याने जंतनाशक गाेळ्यांचे वितरण करताना आराेग्य विभागाची दमछाक हाेत आहे.
१८०० आशांची फाैज
जंतनाशक गाेळ्यांचे वितरण करण्यासाठी जिल्ह्यातील १८०० आशांची फाैज तैनात करण्यात आली आहे, तसेच त्यांच्या मदतीला अंगणवाडी सेविका आणि मदतनीसही देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाऊन जंतनाशक गाेळ्यांचे वितरण करण्यात येत आहे.
काेट
काेराेना संसर्ग वाढत असल्याने शाळा बंद आहेत. त्यामुळे १ मार्चपासून विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन जंतनाशक गाेळ्यांचे वितरण करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ७ लाख ०२ हजार ७३० विद्यार्थ्यांना गाेळ्यांचे वाटप करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
डाॅ. बाळकृष्ण कांबळे, जिल्हा आराेग्य अधिकारी, जि.प., बुलडाणा.