किनगाव जट्टू येथे १०० जणांची काेराेना तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:22 IST2021-06-30T04:22:29+5:302021-06-30T04:22:29+5:30
जिल्ह्यासह लोणार तालुक्यातील कोविडच्या दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत असताना २५ जून रोजी आरोग्य विभागाच्या वतीने १०० नागरिकांची ...

किनगाव जट्टू येथे १०० जणांची काेराेना तपासणी
जिल्ह्यासह लोणार तालुक्यातील कोविडच्या दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत असताना २५ जून रोजी आरोग्य विभागाच्या वतीने १०० नागरिकांची तपासणी करण्यात आली होती़ त्यामध्ये नऊ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने आरोग्य विभाग सतर्क होऊन हे रुग्ण कोविड सेंटर लोणार येथे उपचाराकरिता पाठविण्यात आले़ तसेच सोमवारीच लोणार तालुका आरोग्य अधिकारी किसन राठोड, नायब तहसीलदार पाटील, लोणार पंचायत समिती गटविकास अधिकारी अस्मिता तांबे यांनी किनगाव जट्टू येथील ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेऊन आरोग्य विभागाला मार्गदर्शक सूचना केल्या़ तसेच तपासणीकरिता नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले़ पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील ५० नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या़ यावेळी समुदाय अधिकारी डॉ़ कविता भिसे,आरोग्य सेविका एस़ बी. पवार,आरोग्य सेवक जी़ पी. सानप, आरोग्य सहायक एन. जी. सानप,आशा सेविका यांनी सहकार्य़ केले.