लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : भुईमूग शेंगा तोडण्यासाठी मजुरांना घेऊन जाणारे मालवाहू वाहन उलटल्याने १९ जण जखमी झाले. यापैकी ६ जणांची प्रकृती अत्यवस्थ असून, त्यांना उपचारासाठी अकोला येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना लाखनवाडा ते कंचनपूर रस्त्यावर गुरुवारी सकाळी आसा फाट्यानजीक घडली. लाखनवाडा येथील २५ ते ३0 मजूर एम.एच.२८ एच.७६0४ क्रमांकाच्या मालवाहू वाहनाने कंचनपूर येथे येत होते. दरम्यान, वाहन उलटून रस्त्याकडेच्या नालीत पडले. या अपघातात लक्षमण सरदार, प्रियंका सरदार, प्रेरणा सरदार, वंदना सरदार, ज्योती सरदार, प्रतिभा शेगोकार, मणकर्णा वानखडे, शशिकला वानखडे, रामदास गवई, कुसुम सरदार, रंजना इंगळे, तेजराव सरदार, विजय राऊत यांच्यासह १९ जण जखमी झाले.
मालवाहू वाहन उलटले; १९ जखमी
By admin | Updated: June 9, 2017 01:02 IST