मालवाहू वाहनास अपघात, तीन महिला गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:35 IST2021-03-18T04:35:12+5:302021-03-18T04:35:12+5:30

मेहकर येथून साखरखेर्डामागे मेरा बुद्रुक येथे मालवाहतूक करणाऱ्या एका वाहनाद्वारे तीन महिला व एक पुरुष स्वयंपाक कामासाठी जात होते. ...

Cargo vehicle accident, three women seriously injured | मालवाहू वाहनास अपघात, तीन महिला गंभीर जखमी

मालवाहू वाहनास अपघात, तीन महिला गंभीर जखमी

मेहकर येथून साखरखेर्डामागे मेरा बुद्रुक येथे मालवाहतूक करणाऱ्या एका वाहनाद्वारे तीन महिला व एक पुरुष स्वयंपाक कामासाठी जात होते. दरम्यान, शिंदीकडून साखरखेर्डा गावाकडे भरधाव येणारी एक कार या मार्गावरील एका वळणावर या मालवाहू वाहनाच्या चालकास दिसली नाही. त्यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला. त्यात वाहनातील तिन्ही महिला जखमी झाल्या असून, त्यांना उपचारासाठी मेहकर येथे हलविण्यात आले आहे.

या अपघाताची माहिती मिळताच शेतातून घराकडे जाणारे अशोक तोडे यांनी महिलांना उलटलेल्या वाहनातून बाहेर काढले आणि अपघाताची माहिती साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सुरुशे यांना दिली. त्यांनी घटनास्थळीच वैद्यकीय पथक पाठवून जखमींवर प्रथमोपचार करून त्यांना मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविले.

Web Title: Cargo vehicle accident, three women seriously injured