मालगाडीतील कोळशाने घेतला पेट!

By Admin | Updated: April 25, 2017 00:02 IST2017-04-25T00:02:32+5:302017-04-25T00:02:32+5:30

शेगाव: भुसावळच्या दिशेने दगडी कोळसा वाहून नेत असलेल्या मालगाडीच्या एका वॅगनमधील कोळशाने अचानक पेट घेतल्याची बाब शेगाव रेल्वे स्थानकावर लक्षात आली.

Cargo carrying stolen cargo! | मालगाडीतील कोळशाने घेतला पेट!

मालगाडीतील कोळशाने घेतला पेट!

शेगाव: भुसावळच्या दिशेने दगडी कोळसा वाहून नेत असलेल्या मालगाडीच्या एका वॅगनमधील कोळशाने अचानक पेट घेतल्याची बाब शेगाव रेल्वे स्थानकावर लक्षात आली. माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या शेगाव अग्नीशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही आग आटोक्यात आणली.
नागपूर येथून दगडी कोळसा घेऊन निघालेली २२१५१३८१३७१ या क्रमांकाची मालगाडी सोमवारी दुपारी २ च्या सुमारास शेगाव रेल्वे स्थानकाजवळील लूप लाईनवर सिग्नलच्या प्रतिक्षेत उभी होती. दरम्यान, इंजिनपासून ४७ क्रमांकावर असलेल्या वॅगनमधून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याची बाब रेल्वे पोलीस वईतकार यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ जीआरपी ठाणेदार एम.डी.परदेशी व शेगाव रेल्वे स्थानक प्रबंधक एम. एल. तुंबळे यांच्या ही बाब लक्षात आणून दिली. अधिकाऱ्यांनी सदर घटनेची माहिती भुसावळ येथील विभागीय अधिकाऱ्यांना व शेगाव अग्निशमन विभागाला दिली. तात्काळ घटनास्थळी दाखल झालेल्या शेगाव अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. दरम्यान, या घटनेमुळे मध्य रेल्वेच्या अप मार्गावरील रेल्वे वाहतूक दिड तास बंद करण्यात आली होती.
याप्रकरणी शेगाव अग्नीशमन विभागाचे कर्मचाऱ्यांसह आरपीएफचे अभिषेक दिवेकर, रेल्वे कर्मचारी आनंद कोरडे, ज्ञानेश्वर मामनकर, मालगाडीचे गार्ड टी. के.महल्ले, बबलू कुली, अय्यूबभाई कुली, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य दिनेश शिंदे, नगरसेवक रविंद्र रायणे, प्रवीण बोदडे, गजानन नाईकवाडे, हर्षद बाळापूरे यांनी विशेष परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)

Web Title: Cargo carrying stolen cargo!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.