कारची ऑटोला धडक एक ठार; चार जखमी

By Admin | Updated: May 18, 2014 00:06 IST2014-05-17T23:58:24+5:302014-05-18T00:06:15+5:30

मेहकर तालुक्यातील अपघातात एक ठार तर चार जखमी

A car killed in a car; Four injured | कारची ऑटोला धडक एक ठार; चार जखमी

कारची ऑटोला धडक एक ठार; चार जखमी

मेहकर : सुलतानपूर ते अंजनी खु. रोडवरील जमदार पुलानजीक प्रवासी घेऊन जात असलेल्या ऑटोला मारोती अल्टो गाडीने जबर धडक दिली. या अपघातात ऑटोतील एक जण जागीच ठार झाला, तर चार जण जखमी झाले आहेत. सदर अपघात १७ मे रोजी सकाळी ८.४५ वाजता घडला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एम.एच.२८ एच.५३६८ क्रमांकाचा ऑटो प्रवासी घेऊन अंजनी खु. ते सुलतानपूर जात होता. अंजनी खु. ते सुलतानपूर रोडवरील जमदार पुलानजीक या ऑटोला समोरून येणार्‍या एम.एच.१४ सी.एच.७३९७ क्रमांकाच्या मारोती सुझुकी अल्टोने जबर धडक दिली. यामध्ये ऑटोतील अंजनी खु. येथील सीताराम हरिभाऊ खोटे हे ठार झाले. तर ऑटोत असलेले त्यांचेच नातेवाईक भगवान खोटे, सुनंदा इंगळे, मथुरा आश्रुजी खोटे व आणखी एक जण हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी अंजनी खु. येथील विष्णू भगवान खोटे (३२) यांनी मेहकर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: A car killed in a car; Four injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.