पुलावरून कार कोसळली, दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 22:18 IST2017-09-04T20:58:50+5:302017-09-04T22:18:40+5:30

अमडापूर : चिखली तालुक्यातील मंगरूळ नवघरे गावाला लागून असलेल्या पुलावरून कार पुलाखाली पडल्याने एकाच कुटुंबातील २ जण ठार तर ३ जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवाराी सायंकाळी घडली. 

The car collapsed on the bridge, two killed | पुलावरून कार कोसळली, दोन ठार

पुलावरून कार कोसळली, दोन ठार

ठळक मुद्देचिखली तालुक्यातील मंगरूळ नवघरे गावाजवळ घडली घटनागावालगतच्या पुलावरून कार खाली कोसळलीतीन गंभीर जखमी; सोनुने कुटुंबावर काळाचा घाला

लोकमत न्यूज नेटवर्क
अमडापूर : चिखली तालुक्यातील मंगरूळ नवघरे गावाला लागून असलेल्या पुलावरून कार पुलाखाली पडल्याने एकाच कुटुंबातील २ जण ठार तर ३ जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवाराी सायंकाळी घडली. 
मलकापूर येथील रहिवासी व सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले रोहीदास सिध्दु सोनुने, सुनिता सुनिल सोनुने, सुनिल सोनुने, चेतन सुनिल सोनुने, अंजु सुनिल सोनुने सर्व  हे वाडेगाव येथून एम.एच.१४ सीके ३५५७ क्रमांकाच्या सेन्ट्रो कारने अमडापूर ते लव्हाळा रोडने साखरखेर्डा येथे जात असताना मंगरूळ नवघरे गावाजवळील पुलावरून गाडी पुलाखाली पडली. गाडीमधील रोहीदास सिध्दु सोनुने (वय ६०), सुनिता सुनिल सोनुने (वय ३५) ठार झाले. तर सुनिल सोनुने, चेतन सुनिल सोनुने, अंजु सुनिल सोनुने हे गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच अमडापूर ठाणेदार गावंडे, उमेश भोसले, पोलिस हेड कॉन्सटेबर ज्ञानदेव ठाकरे, साकरे यांच्याासह गावकºयांनी या गाडीतील अपघातग्रस्तांना बाहेर काढून पुढील उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले.

Web Title: The car collapsed on the bridge, two killed