कार व मोटारसायकलची धडक

By Admin | Updated: May 14, 2014 23:57 IST2014-05-14T23:45:17+5:302014-05-14T23:57:48+5:30

मनसेचे जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांच्यासह चार जखमी

The car and the motorbike strike | कार व मोटारसायकलची धडक

कार व मोटारसायकलची धडक

जळगाव जामोद : मनसेचे जिल्हा प्रमुख गजानन वाघ यांची कार व मोटारसायकल यांची समोरासमोर धडक झाल्याने पाच जण जखमी झाले असून दोघे गंभीर आहेत. हा अपघात आज १४ रोजी सायंकाळी ६ वाजता बर्‍हाणपूर रोडवर श्री संत गजानन महाराज मंदीराजवळ झाला. याबाबतची माहिती अशी की, मोटारसायकलवर रामेश्‍वर गजानन कोथळकर, रामा कोथळकार व आणखी एक असे गावातून धानोरा रस्त्याने जात असताना बर्‍हाणपूर रोडने गजानन वाघ हे त्यांच्या एमएच२८-व्ही६0६१ कारने गावाकडे येत होते. मोटारसायकल व कारची समोरासमोर जबर धडक झाली त्यामध्ये मोटारसायकलस्वार हे गंभीर जखमी झाले. तर गजानन वाघ यांना किरकोळ मार लागला. त्यांच्या कारने इलेक्ट्रीक पोलला धडक दिल्याने कारच्या समोरच्या भागाचा पार चेंदामेंदा झाला. जखमींना त्वरीत अकोला येथे पाठविण्यात आले. वृत्त लिहीपर्यंत या घटनेचा गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता. अपघात हा गावानजीकच घडल्याने जखमींना त्वरीत मदत मिळाली.

Web Title: The car and the motorbike strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.