शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

दूषित पाणीपुरवठ्यावरून रणकंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 16:53 IST

बुलडाणा: येथील येळगाव धरणावरील दूषित पाणीपुरवठ्यावरून प्रशासन व लोकप्रतिनिधीमध्ये रणकंदन सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: येथील येळगाव धरणावरील दूषित पाणीपुरवठ्यावरून प्रशासन व लोकप्रतिनिधीमध्ये रणकंदन सुरू आहे. शहराच्या दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून तो सुरळीत करण्यासाठी पालिका मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आलेला अल्टीमेटम सोमवारी संपला आहे. दरम्यान, सोमवारी जलशुध्दीरण केंद्राची उच्चस्तरीय पथकाकडून पाहणी करण्यात आली असून, जिल्हाधिकारी गुरूवारी विशेष घेणार आढावा घेणार आहेत.शहराला पाणीपुरवठा करणाºया येळगाव धरणावरील जलशुध्दीकरण केंद्रांच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या अल्टीमेटमच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा शहरास स्वच्छ पाणीपुरवठा सुरू झाला असून अनुषंगिक उपाययोजनांसाठी सुमारे दीड कोटी रूपयांची निविदा नगर परिषदेने प्रसिध्द केली आहे. दरम्यान, उच्च स्तरीय पथकाने जलशुध्दीकरण केंद्रास समक्ष भेट देऊन झालेल्या सुधारणांचा सर्वंकष आढावा घेतला. यावेळी शहरातील कृत्रिम पाणी टंचाईस कारणीभूत ठरत असलेल्या जलकुंभांचे बांधकाम जागानिश्चितीसह तातडीने सुरू करण्याबाबत नगर परिषद प्रशासनास निर्देश देण्यात आले. निवडणूक विभागाच्या बैठकीसाठी जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे जिल्ह्याबाहेर दौºयावर असल्याने ही बैठक १३ जून रोजी पुन:श्च आयोजित करण्यात आली आहे.अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोदसिंग दुबे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या तातडीच्या बैठकीत १० जून पर्यंत कारभार सुरळीत करण्याचा अल्टिमेटम नगर परिषद प्रशासनास देण्यात आला होता. यामुळे नगर परिषद प्रशासनाने मुख्य जलवाहिन्यांवरील लिकेजेस काढून फिल्टर चेंबर मधील गाळ उपसा व घाण साफ केल्याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनास सादर केला.अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोदसिंग दुबे, तहसिलदार संतोष शिंदे यांच्या उच्चस्तरीय पथकाने झालेल्या कामकाजाबाबत प्रत्यक्ष स्थळनिरीक्षण करून सोमवारी आढावा घेतला. यावेळी आ. हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ता काकस, नगर परिषदेचे अभियंता राजेश गायकवाड हे प्रामुख्याने उपस्थित होते.जलशुध्दीकरणाच्या सुधारणेसाठी खर्चाचा प्रस्ताव१३ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पुन:श्च बैठक आयोजित करण्यात आली असून आजच्या पाहणी दौºयातील अहवाल जिल्हाधिकाºयांना सादर केल्या जाणार आहे. तर दुसरीकडे ११ जून रोजी नगर परिषदेच्या सर्वसाधारण बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीच्या विषयपत्रिकेवर सुध्दा जलशुध्दीकरणाच्या सुधारणेसाठी आवश्यक असलेल्या खर्चाचा मान्यता प्रस्ताव संबंधित विभागाने विषयपत्रिकेवर घेतला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाWaterपाणी