उमेदवारांना ८५ चिन्हांचा पर्याय
By Admin | Updated: October 1, 2014 00:49 IST2014-10-01T00:28:07+5:302014-10-01T00:49:46+5:30
राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षांकरिता सात चिन्हे राखीव.

उमेदवारांना ८५ चिन्हांचा पर्याय
बुलडाणा : विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष वगळता अपक्षांसाठी ८५ निवडणूक चिन्हांची यादी जाहीर केली. राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षांकरिता सात चिन्हे राखीव आहेत. सर्व अपक्षांसाठी खुल्या असलेल्या चिन्हांमध्ये ढोल, काठी, शिटी, नारळ, हिरवी मिरची, गांजर, चपला, टोपी आदी चिन्हांचा समावेश आहे. १५ ऑक्टोबरला जिल्ह्यात मतदान होणार आहे. १ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाईल. राजकीय पक्षांकडून अधिकृत उमेदवार अजून निश्चित झालेले नसले तरी अनेकांनी अपक्ष लढण्याची तयारी केली आहे. त्यांच्यासाठी ८५ मुक्त चिन्हेही जाहीर केली आहेत. प्रमुख राजकीय पक्षांना सात अधिकृत चिन्हे आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या यादीत शिवसेनेचा धनुष्यबाण, काँग्रेसचा पंजा, राष्ट्रवादीचे घड्याळ, मनसेचे रेल्वे इंजिन, बसपसाठी हत्ती, भाजपाचे कमळ आणि सीपीआयचे विळा-कणीस या चिन्हांचा समावेश आहे. उपरोक्त चिन्हे मिळाल्यानंतर आता उमेदवारांचा प्रचार खर्या अर्थाने सुरू होईल.