काँग्रेस व भारिपच्या उमदेवारांचे अर्ज रद्द
By Admin | Updated: July 15, 2015 00:52 IST2015-07-15T00:52:37+5:302015-07-15T00:52:37+5:30
शेगाव नगर पालिकेच्या एका जागेसाठी तिघांचे अर्ज

काँग्रेस व भारिपच्या उमदेवारांचे अर्ज रद्द
शेगाव (जि. बुलडाणा) : शेगाव नगर पालिकेचे नगराध्यक्ष बंडूबाप्पू देशमुख याच्या आकस्मिक निधनाने रिक्त झालेल्या न.प. सदस्य पदासाठी ४ आगस्ट रोजी होणार्या पोट निवडणुकी साठी मंगळवारी अर्ज छानणी च्या दिवशी कॉंग्रेस आणि भारिप बमस या पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज विविध कारणांनी रद्द झालेत. आता शिवसेनेच्या छाया पल्हाडे , अपक्ष सौ. प्रतिभा शेगोकार तसेच मंगेश फुसे यांच्यात ही लढत होणार आहे. यामुळे आता राजकीय समीकरणे बदलली आहे. ४ आगस्ट रोजी होणार्या पोट निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु असून मंगळवारी शिवसेना, कॉंग्रेस,भारिप बमस. या पक्षांनी अधिकृतरित्या ए.बी फार्म लावून उमेदवारी अर्ज दाखल केलेत.तर भाजपा ने ए.बी फार्म ची खेळी न खेळत वेट एंड वाच ची भूमिका घेतली. मंगळवारी अर्ज छानणी च्या दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे यांच्या आदेशान्वय रवींद्र शेगोकार यांना उमेदवारी देण्यात आली. दुसरी कडे भारिप बमस.या पक्षाकडून शेख जब्बार ठेकेदार तसेच त्यांच्या पत्नी मादिना बी. यांचा अर्ज आक्षेप घेतल्या नंतर विविध कारणांनी रद्द झालेत.यामुळे आता राजकीय समीकरणे बदलली आहे. भाजपा म.न.से.आणि राष्ट्रवादी चा अधिकृत उमेदवार रिंगणात नाही. यामधील म.न.से.आणि राष्ट्रवादी ने आपला पाठींबा अजून जाहीर केलेला नसला तरी भाजपा अपक्ष मंगेश फुसे यांना त्यांचा पाठींबा देणार असल्याची माहिती आहे तर . तर दुसरी कडे काँग्रेस चे गजानन शेगोकार यांच्या पत्नी सौ. शेगोकार यांच्या साठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष पाठींबा देणार असल्याचे चिन्हे दिसत आहे. तर शिवसेने कडून छाया पल्हाडे ह्या रिंगणात आहेत.एकूण १ जागे साठी होणारी ही लढत तिघांमध्ये सरळ -सरळ होणार आहे.