‘त्या’ कंत्राटदाराचा ठेका रद्द करा

By Admin | Updated: December 8, 2014 01:30 IST2014-12-08T01:30:40+5:302014-12-08T01:30:40+5:30

चिखली तालुक्यातील निकृष्ट पोषण आहार प्रकरण.

Cancel the Contract Contractor's contract | ‘त्या’ कंत्राटदाराचा ठेका रद्द करा

‘त्या’ कंत्राटदाराचा ठेका रद्द करा

चिखली : अधिकार्‍यांशी संगनमत करून बालवाडीतील निरागस बालकांना निकृष्ट दर्जाचा पोषण आहार पुरविणार्‍या व त्यांच्या आरोग्यास बाधा पोहचवून कुपोषणाच्या खाईत लोटणार्‍या पोषण आहार पुरवठादाराचा ठेका तत्काळ रद्द करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी तालुकाध्यक्ष विनायक सरनाईक आदींनी दिला आहे.
अंगणवाडीतील बालकांना निकृष्ट दर्जाचा व कुजक्या कडधान्याचा पोषण आहार पुरविल्या जा त असल्याची तक्रार केल्यानंतर संबंधित विभागाकडून पुरवठादार व जबाबदार अधिकार्‍यांना वाचविण्यात येत असून, याप्रकरणी थातूरमातूर चौकशी व पोषण आहाराचे चुकीच्या पद्धतीने नमुने घेऊन अधिकारी वर्ग स्वत:ला वाचविण्यासाठी सेविकांना दोषी ठरविण्याच्या प्रयत्न करीत आहेत. असे असताना वरिष्ठांनी याप्रकरणी लक्ष घालून जबाबदार अधिकार्‍यांवर कारवाई करणे गरजेचे असतानाही दुर्लक्ष होत असल्याने विनायक सरनाईक यांनी याबाबत जिल्हाधिकारी बुलडाणा यांना स्मरणपत्र दिले आहे.
पोषण आहारातील कीड लागलेले व कुजके धान्य दिसून येते; मात्र एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाला यात काहीच आढळून येऊ नये, ही बाब निश्‍चितपणे भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारी असून, याप्रकरणी पारपदश्रीपणाने पोषण आहरासाठी पुरविल्या जाणार्‍या धान्य व इतर सामग्रीचे नमुने घेणे आवश्यक असताना अधिकार्‍यांनी अंगणवाडी सेविकांवर दबाव आणून चुकीच्या पद्धतीने कुठल्याही जबाबदार नागरिकांच्या उपस्थितीशिवाय नमुने घेऊन पोषण आहार चांगल्या दर्जाचा असल्याचा निर्वाळा दिला आहे.
याप्रकारामुळे संबंधित कार्यालय व अधिकार्‍याचे पोषण आहार पुरविणार्‍या पुरवठादाराशी संगनम त असल्याचे सिद्ध होत असून, त्याला वाचविण्यासोबतच स्वत:चीही चामडी शाबूत ठेवण्याचा प्रकार सुरू असल्याने याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने तातडीने कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करावी तसेच संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करण्यात येऊन याप्रकरणातील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Cancel the Contract Contractor's contract

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.