देऊळगावराजामध्ये दीड कोटीची कापूस खरेदी
By Admin | Updated: November 29, 2014 00:01 IST2014-11-29T00:01:51+5:302014-11-29T00:01:51+5:30
फेडरेशनची केवळ आठ क्विंटल खरेदी: शेतक-यांनी फिरविली पाठ.

देऊळगावराजामध्ये दीड कोटीची कापूस खरेदी
देऊळगावराजा (बुलडाणा): गत चार-पाच वर्षापासून शासन कापसाचे हमीभाव ठरविते, मात्र खाजगी व्यापारी या भावापेक्षा जास्त भाव देत असल्याने कापूस उत्पादकांनी फेडरेशनकडे पाठ फिरवून आजवर खाजगी व्यापार्यांना १ कोटी ६0 लक्ष रुपयांचा माल दिला आहे तर फेडरेशनला केवळ साडेआठ क्विंटल आवक झाल्याची माहिती आहे.
फेडरेशनचा भाव कमाल ३९५0 रुपये प्रतिक्विंटल असून याऊलट खाजगी व्यापारी कमाल भाव ४१९0 रु. प्रतिक्विंटल ग्रेड तपासून देत आहे. याचबरोबर फेडरेशनने खरेदी केलेल्या कापसाचा चुकारा मिळण्यास आठ ते दहा दिवस लागतात मात्र खाजगी व्यापारी कापूस उत् पादकांना त्वरीत चुकारा व नगरी रक्कम देत असल्याने शासनाच्या कापूस खरेदीकडे शे तकर्यांनी पाठ फिरविली आहे. यामध्ये कापूस खरेदीचा शुभारंभ सर्वप्रथम खाजगी व्यापारी यांनी विजयादशमीनंतर सुरू केला तर फेडरेशनने उशिरा खरेदी सुरू केल्याने बाजार समि तीमधील खाजगी खरेदी केंद्रावर एकूण आठ ठिकाणी आपला कापूस खरेदी करुन देऊन रोख रक्कम प्राप्त करुन घेतली. यामध्ये आतापर्यंत खाजगी खरेदी ४0 हजार ३२६ क्विंटल झाली असून या तुलनेत फेडरेशनची कापूस खरेदी केवळ ८ क्विंटल ५३ किलो एवढीच झालेली आहे. काही वर्षापूर्वी देऊळगावराजा येथील कापूस बाजारपेठेमध्ये येणार्या विदर्भ-मराठवाडा या सिमेवरील कापूस उत्पादकांना बटाव तसेच कटती या नावाखाली क पात करण्यात येत होती. मात्र यावर्षी कापूस उत्पादकांकडून प्रतिक्विं टल ४ रु. प्रमाणे हमाली घेण्यात येत आहे. कापूस खरेदी सुरू झाल्यापासून आजवर शेतकर्यांनी कोणतेही आक्रमक आंदोलन, रास्ता रोको केलेले नसून शेतकर्यांच्या समस्या सोडवून त्यांना योग्य न्याय देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू यासाठी कापूस उत्पादकांनी बाजार समितीला सहकार्य करावे, असे आवाहन लोकमतशी बोलताना बाजार समितीचे सचिव म.तू.शिंगणे यांनी केले.