‘इंजेक्शन घ्यायचे, निडल विकत आणा!’
By Admin | Updated: December 6, 2014 00:13 IST2014-12-06T00:13:53+5:302014-12-06T00:13:53+5:30
बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात बाह्यरुग्ण.

‘इंजेक्शन घ्यायचे, निडल विकत आणा!’
बुलडाणा : जिल्हा सामान्य रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात दररोज येणार्या रुग्णाला डॉक्टरांनी इंजेक्शन लिहुन दिल्यास या इंजेक्शनला लागणारी निडल(सुई) रुग्णांना विकत आणावी लागते. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार जिल्हा सामान्य रूग्णालयात सुरू असून, रुग्णांना नाहक भुर्दंड पडत आहे.
एकेकाळी प्रत्येक रुग्णालयात काचेची सिरींज व स्टिलची निडल(सुई) असायची. ही सिरींज व निडल सतत पाण्यात उकळून त्याद्वारे रुग्णांना इंजेक्शन टोचल्या जात होते. एकाच निडलचा अनेक रुग्णांवर वापर होत होता. त्यामुळे कधी-कधी निष्काळजी केल्यास इंजेक्शनद्वारे इतर रुग्णांचा जंतू संसर्ग होत होता. आता स्टिलची निडल व काचेची सिरींज जावून त्याजागी डिस् पोजेबल प्लास्टिकची सिरींज आणि निडल बाजारात आल्या. एका रुग्णावर सिरींज व निडलचा वापर झाल्यानंतर त्या फेकून दिल्या जातात. दुसर्या रुग्णावर त्याचा पुन्हा वापर होत नाही.त्यामुळे इंजेक्शनद्वारे जंतू संसर्गाचा धोका राहिला नाही. सर्वच रुग्णालयात या सिरींज व निडलचा वापर होत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात तर या सिरींज व निडल मोफत उपलब्ध करून दिल्या जा तात; मात्र गेल्या काही वर्षांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात येणार्या रुग्णांना ही सुई बाहेरून विकत आणण्याचे सांगितल्या जाते, त्यामुळे रुग्णांना विनाकारण आ िर्थक भुर्दंड सहन करावा लागतो.
*दररोज येतात २00 रूग्ण
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज २00 ते २५0 रुग्ण येतात. त्यापैकी किमान ५0 ते १00 रुग्णांना इंजेक्शन सांगितल्या जाते. हे इंजेक्शन देण्यासाठी प्रत्येकवेळी इंजेक्शन विभागातील परिचारिका २२ किंवा २४ नंबरची सुई खासगी मेडिकल दुकानावरून विकत आणण्यास सांगतात. ही सुई दुकानात दोन रुपयाला मिळते. इंजेक्शन रुममध्ये गेल्यानंतर सुई विकत आणण्यास सांगितल्या जाते.