प्रतीक्षा कापूस खरेदीची
By Admin | Updated: November 6, 2014 00:20 IST2014-11-06T00:01:20+5:302014-11-06T00:20:35+5:30
खासगी भाव तुटपुंजे : बुलडाणा येथे व्यापा-यांकडून ३२00 रुपयांनी कापूस खरेदी

प्रतीक्षा कापूस खरेदीची
बुलडाणा : राज्य शासनाच्या पणन महासंघाकडून कापूस एकाधिकार योजनेनुसार होणार्या कापूस खरेदीला अद्यापही मुहूर्त गवसला नाही. शासनाचा हमीभाव हा ४ हजार ३६0 रुपये एवढा आहे. मात्र, व्यापार्यांकडून सद्य:स्थितीत शेतकर्यांना प्रतिक्विंटल ३ हजार २00 ते ३६00 रुपये असा भाव दिला जात आहे. त्यामुळे शेतकर्यांना पणन महासंघाच्या वतीने सुरू होणार्या खरेदीची प्रतीक्षा आहे.
सोयाबीन व कापूस हे दोनच प्रमुख नगदी पिके असून, यावर्षी या दोन पिकांवरच शे तकर्यांचे अर्थचक्र अवलंबून आहे. सुरुवातीला पावसाने मारलेली दडी व परतीच्या पावसाने दिलेली जोरदार हजेरी यामुळे या दोन्ही पिकांना फटका बसला आहे. कापसाचे सरासरी एकरी उत्पादन घटले असून, उत्पादनाचा खर्चही भरून निघणार नाही असा बाजारभाव सध्या कापसाला आहे. सद्य:स्थितीत सुरू असलेली खासगी कापूस खरेदी ही ३२00 ते ३६00 रु पयांपर्यंत असल्याचे शेतकर्यांना आर्थिक तोटा होत आहे. त्यामुळे शासनाने खरेदीची घोषणा जरी झाली तरीही बाजारपेठेत कापसाचे भाव वाढतात व सरासरी क्विं टलमागे ४00 रुपयांचा फायदा शेतकर्यांना होऊ शकतो. शासनाने लांब स्टेपलच्या कापसाला चार हजार रुपये हमी भाव जाहीर केला आहे. मात्र, प्रत्यक्ष खरेदी कधी सुरू होणार, याची बळीराजाला प्रतीक्षा आहे.
शासनाने शेतकर्यांचे हित जोपासण्यासाठी कापसाला किमान सहा ते सात हजार रु पये हमी भाव देण्याची गरज आहे. यावर्षी पावसाने मारलेली दडी व परतीच्या पावसाचा फटका यामुळे उत्पादनात घट आली असल्याचे कापूस उत्पादक शेतकर्यांनी सांगीतले.
*जळगाव बाजार समितीचे सीसीआयला पत्र
जळगाव जामोद तालुक्यात बागायती आणि कोरडवाहू कापसाचे उत्पादन हे सर्वाधिक आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकर्यांकडे कापूस घरी आला असून, पणन महासंघ व सीसीआयकडून कापूस खरेदी सुरू झालेली नाही. त्यामुळे कापूस खरेदी सुरू करावी, अशी मागणी बाजार समितीचे मुख्य प्रशासक रमेश पाटील यांनी सीसीआयकडे केली आहे.