विद्यार्थ्यांनी अडविल्या बसेस
By Admin | Updated: September 2, 2015 02:27 IST2015-09-02T02:27:46+5:302015-09-02T02:27:46+5:30
मेहकर तालुक्यात शाळेच्या वेळेवर बसफे-यांच नाहीत.

विद्यार्थ्यांनी अडविल्या बसेस
मेहकर : शाळेच्या वेळेवर एसटी बसेस येत नसल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. आगार प्रमुखाला सतत निवेदने देऊनही काहीच उपयोग न झाल्याने अखेर संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी १ सप्टेंबर रोजी शेलगाव देशमुख येथे एस.टी.बसेस अडवून आपला निषेध व्यक्त केला. शाळेच्या विद्यार्थ्यांंसाठी मानव विकास अंतर्गत एस.टी. बसेस शासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत; मात्र आगाराच्या नियोजनशून्य कारभारामुळे तालुक्यात विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. शाळेच्या वेळेवर एस.टी. बसेस सुटत नसल्याने विद्यार्थ्यांंचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दरम्यान, शेलगाव देशमुख येथील विद्यार्थ्यांंना डोणगाव येथे शाळेत येण्यासाठी एस.टी.बसेस वेळेवर येत नाहीत. त्यामुळे रमेश बियाणी, संतोष राऊत, गजानन नरवाडे यांच्या नेतृत्वात आगारप्रमुख चंद्रकांत पाथरकर यांना वेळोवेळी निवेदने देण्यात आली आहेत; मात्र आगार प्रमुख पाथरकर यांनी कोणतीच दखल न घेतल्याने शेलगाव देशमुख येथील विद्यार्थ्यांंनी इसवीवरून डोणगावकडे येणार्या सकाळी ६, ८, ९ व ११ वाजता होणार्या एसटी बसेसफेर्या शेलगाव देशमुख येथे अडवून महामंडळाच्या कारभाराचा निषेध व्यक्त केला आहे.