व्यापार्याची एक लाखाची रोकड पळविली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 23:59 IST2017-08-17T23:53:30+5:302017-08-17T23:59:17+5:30
खामगाव : येथील बकरी बाजारात म्हशींची खरेदी करण्यासाठी आलेल्या एका व्यापार्याकडील एक लाख रुपये रोख पळविल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. याप्रकरणी व्यापार्याच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

व्यापार्याची एक लाखाची रोकड पळविली!
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : येथील बकरी बाजारात म्हशींची खरेदी करण्यासाठी आलेल्या एका व्यापार्याकडील एक लाख रुपये रोख पळविल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. याप्रकरणी व्यापार्याच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
हरिभाऊ निंबाजी मुंढे (वय ४0) रा.पाहाडी जि.बीड हे गुरुवारी येथील बकरी बाजारात म्हशी खरेदीसाठी आले होते. पहाटे ते बकरी बाजार परिसरात उघड्यावर शौचास गेले असता अज्ञात दोन चोरट्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवून एक लाख रुपये रोख असलेला पायजामा घेऊन पळ काढला. यावेळी त्यांनी चोरट्यांचा पाठलाग केला; परंतु ते पळून जाण्यात यशस्वी झाले. याप्रकरणी त्यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली.