ग्रामीण भागात व्यवसाय लाॅकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:34 IST2021-04-18T04:34:24+5:302021-04-18T04:34:24+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाच्या आदेशावरून जमावबंदी व संचारबंदी आदेशाचे सगळीकडे काटेकोर पालन होत आहे. ...

ग्रामीण भागात व्यवसाय लाॅकडाऊन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाच्या आदेशावरून जमावबंदी व संचारबंदी आदेशाचे सगळीकडे काटेकोर पालन होत आहे. किराणा, भाजीपाला, फळे विक्री तसेच चहा, नाश्त्याची हॉटेल्स, मोबाईल दुरुस्ती व इलेक्ट्रीक साहित्याची दुकाने, सलून, शिवणकाम, पान टपरी व लॉन्ड्री यासारखे अनेक लहान व्यवसाय मंदीची झळ सोसत आहेत. रोजगारासाठी शहरात जाण्याऐवजी गावातच पोटापाण्यासाठी धडपडणाऱ्या व्यावसायिकांची मोठी आर्थिक कोंडी त्यामुळे झाली आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात आरोग्याची स्थिती अजूनही चांगली असून, कोरोना बाधितांमध्येही ग्रामीण भागातील रूग्ण कमी आहेत. फिजिकल डिस्टन्सिंगसह आरोग्याची काळजी घेतली जात असल्याने विरळ लोकवस्ती असलेल्या ग्रामीण भागात सध्यातरी चिंतेचे वातावरण दिसून आलेले नाही. शेतकरी व शेतमजूर नेहमीप्रमाणे शेतीकामांमध्ये व्यस्त आहेत. लहान व्यावसायिकांचे मात्र हाल होत आहेत.