बसच्या काचा फोडल्या; गुन्हा दाखल
By Admin | Updated: September 30, 2015 00:28 IST2015-09-30T00:28:10+5:302015-09-30T00:28:10+5:30
खामगाव ग्रामीण पोलिसांनी अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल केला.

बसच्या काचा फोडल्या; गुन्हा दाखल
खामगाव : लक्झरी बसच्या काचा फोडल्याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. लक्झरी बस (क्रमांक एमएच २७-ए९६६९) ही २७ सप्टेंबर रोजी खामगाव येथून पुणेकडे जात असताना रात्री २ वाजताच्या सुमारास चिखली मार्गावरील वृद्धाश्रमासमोर दुचाकीने (एमएच२८-३९९९) आलेल्या दोन अज्ञात युवकांनी लक्झरीच्या काचांवर दगडफेक केली.
हल्ल्यात लक्झरीमधील प्रवासी विशाल किसन मोहुरे (२५ रा. अमरावती), विक्की वासुदेव भगत (२२ मोरेगाव ता. मूर्तिजापूर) व प्रमोद साहेबराव निस्ताने ( ४0 रा. अमरावती) हे तिघे जखमी झाले. याप्रकरणी लक्झरी चालक सुनील कोंडे (रा. अमरावती) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. खामगाव पोलीस प्रकरणाचा तपास करीत आहेत.