बसस्थानकाचा प्रश्न अधांतरी

By Admin | Updated: August 28, 2014 23:53 IST2014-08-28T23:47:24+5:302014-08-28T23:53:48+5:30

पिंपळगाव राजा वासीयांना बसस्थानकाची प्रतीक्षा.

Bus Station Question Hour | बसस्थानकाचा प्रश्न अधांतरी

बसस्थानकाचा प्रश्न अधांतरी

पिंपळगाव राजा : गेल्या २0 वर्षापेक्षा अधिक काळापासून बहूप्रतिक्षित प्रलंबित असलेल्या येथील एस.टी. बसस्थानकाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. या ग्रामीण सर्कलच्या सर्वांगिण विकासात मानाचा तुरा ठरणारा हा प्रश्न एस.टी. महामंडळाकडून पाठपुरावा झाला नसल्याने अद्यापही सुटू शकला नाही.
खामगाव तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्येचे आणि राजकीयदृष्ट्या महत्वाचे समजल्या जाणार्‍या ग्रामीण सर्कलमधील जनतेसाठी केंद्रबिंदु असणार्‍या पिंपळगाव राजा येथे एस.टी. बसस्थानक होणे गरजेचे आहे. गावाच्या सर्वांगिण विकासासोबतच परिसरातील जनतेच्या सोयी सुविधेसाठी लाखो रूपये किंमतीची मुख्य रोडलगत असलेली जमीन दानदाते हरीभाऊ बोंबटकार यांनी एसटी महामंडळाला दान दिली आहे. त्यावर अतिक्रमण होवू नये म्हणून एसटी विभागाने त्या जागेला तारेचे कुंपन सुध्दा केले आहे. मात्र २0 वर्षापेक्षा अधिक काळ उलटून गेल्यानंतरही या जागेवर एसटी बसस्थानक झाले नाही. येथे बसस्थानक व्हावे, अशी वारंवार मागणी होत आहे. त्यासाठी सरपंच, उपसरपंच तसेच स्थानिक नेते सुध्दा सर्वात जास्त जबाबदार आहेत, असे म्हटले तर वावगे होणार नाही.
या ग्रामीण परिसराचे केंद्रबिंदु असल्याने पिंपळगाव राजा येथे प्रवाशांची रहदारी सर्वाधिक आहे. खामगाव, नांदुरा, जळगाव जामोद, मोताळा, मलकापूर, बुलडाणा या आगाराच्या एस.टी. बसेस प्रवाशांच्या सेवेत धावत आहेत. सध्या परिस्थितीत ज्याठिकाणी एसटी बस थांबा आहे तेथे बस फिरविण्यासाठी सुध्दा जागा नाही. त्यामुळे चालकाला खुप अंतरावरून बस वळती कराव्या लागत आहेत. त्याचबरोबर सध्याच्या एसटी बस थांब्यावर प्रवाशांसाठी उभे राहण्याची सुध्दा जागा नाही. महिला व पुरूषांसाठी मुत्रीघर नाही. तर गावापासून अंतरावर असणार्‍या या बसथांब्यापासून गावापर्यंत पथदिव्यांची सुध्दा व्यवस्था नाही. त्यामुळे रात्री येथे येणार्‍या प्रवाशांना गावापर्यंत अंधारात जावे लागते. बाहेरगावी जाणार्‍या प्रवाशांना असुरक्षितपणे येथे अंधारात उभे राहावे लागते. या ग्रामीण परिसरातील जनतेला या सर्व समस्येपासून मुक्त करण्यासाठी येथे सुविधायुक्त बसस्थानक त्वरीत उभारण्यात यावे, अशी मागणी स्थानिक परिसरासह जनतेकडून केल्या जात आहे.

Web Title: Bus Station Question Hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.