बसची झाडाला धडक,11 जखमी
By Admin | Updated: June 10, 2017 13:49 IST2017-06-10T13:49:42+5:302017-06-10T13:49:42+5:30
मलकापूरवरून सोलापूरसाठी निघालेल्या बसने मूर्ती फाट्याजवळ शनिवारी दहा वाजताच्या दरम्यान झाडाला धडक दिल्याने 11 प्रवासी जखमी झाले.

बसची झाडाला धडक,11 जखमी
बुलडाणा : मलकापूरवरून सोलापूरसाठी निघालेल्या बसने मूर्ती फाट्याजवळ शनिवारी दहा वाजताच्या दरम्यान झाडाला धडक दिल्याने 11 प्रवासी जखमी झाले.
एमएच 14 - बीटी - 4356 क्रमांकाची बस मलकापूरवरून सोलापूरकडे जात असताना मूर्ती फाट्याजवळ समोर अचानक दुचाकी आल्याने दुचाकिस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्तनात बसची झाडाला धडक लागली. यामध्ये सोपान कोथळकर, सुरेश कोथळकर, देविदास कोथळकर, लक्ष्मी जाधव, कैलास सावळे, फारूक शहा, सै. अजीम सै. कलीम, सुरेश जवरे यांच्यासह 11 जण जखमी झाले. चार जणांना पुढील उपचारासाठी अकोला पाठविण्यात आले आहे.