बसची धडक : दुचाकीस्वार ठार

By Admin | Updated: April 12, 2017 00:50 IST2017-04-12T00:50:04+5:302017-04-12T00:50:04+5:30

चिखली- बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना कोलारा फाट्यानजिक घडली.

The bus collides with a biker killed | बसची धडक : दुचाकीस्वार ठार

बसची धडक : दुचाकीस्वार ठार

चिखली : चिखलीहून मेहकरकडे जाणाऱ्या दुचाकीस विरुद्ध दिशेने येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना ११ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास कोलारा फाट्यानजिक घडली.
जानेफळ ता.मेहकर येथील तुकाराम बारकु पवार वय ५५ वर्षे व कैलास तुकाराम पवार वय १६ वर्षे हे दोघे पिता-पुत्र ११ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास बजाज डिस्कव्हर मोटारसायकल क्रमांक एम.एच.२८ एई १२२४ वरून चिखलीहून मेहकरकडे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बस क्रमांक एम एच २० बीएल २३७४ या अहमदपूर-बुलडाणा जाणाऱ्या बसने दुचाकीस जोरदार धडक दिल्याने या भीषण अपघातात दुचाकीस्वार तुकाराम बारकु पवार वय ५५ वर्षे यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा १६ वर्षिय मुलगा कैलास तुकाराम पवार गंभीर जखमी झाला आहे. त्यास रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी प्रसंगावधान राखून उपचारार्थ तातडीने स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते.

अपघातात एक ठार
हिवराआश्रम : मेहकरवरुन घरी परतत असताना मेहकर चिखली रोडवर उसरण ते देऊळगाव माळी फाट्याच्यामध्ये ट्रक व मोटारसायकलमध्ये धडक होऊन एक ठार तर एक गंभीर झाल्याची घटना सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. चिखली तालुक्यातील आमखेड येथील विनोद तांदुळे यांचे हिवराआश्रम येथे हेअर सलुनचे दुकान आहे. सोमवारी मेहकरवरुन मोटारसायकल क्र.एम.एच.२८ - ए.एम.४१७९ ने विनोद तांदूळे वय २६ व रवि राऊत हे परतत होते. उसरण ते देऊळगाव माळी फाट्या दरम्यान ट्रक क्रमांक एम.एच.२० डी.ई.३९४६ ने मोटारसायकलला धडक दिली. यामध्ये विनोद तांदूळे जागीच ठार झाला, तर रवी राऊत हा गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच उपसरपंच अमोल म्हस्के, गजानन राठोड, सोनू नवघरे यांनी अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल केले.

 

Web Title: The bus collides with a biker killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.