बसच्या धडकेत काळवीट ठार
By Admin | Updated: July 17, 2014 23:59 IST2014-07-17T22:59:45+5:302014-07-17T23:59:55+5:30
मातोळा तालुक्यातील किन्होळय़ाजवळील घटना

बसच्या धडकेत काळवीट ठार
मोताळा : एसटी बसच्या धडकेत एक काळवीट ठार झाल्याची घटना तालुक्यातील लालमाती फाट्याजवळील किन्होळय़ाजवळ १७ जुलै रोजी घडली. याबाबत मिळालेल्या माहितीवरून मलकापूर येथून पिंप्रीगवळी मार्गे धामणगाव बढेकडे येणारी महामंडळाची बस क्रमांक एम.एच.४0 एन.८२५२ ही लालमाती फाट्याजवळील किन्होळा येथे शेतातून दहा ते बारा कुत्री एका काळवीटाचा पाठलाग करीत होते. काळवीट जीव वाचविण्यासाठी धावत असताना बसची जबर धडक बसली. या धडकेत काळवीट जागीच गतप्राण होऊन त्याची दोन्ही शिंगे तुटली. बसचालक पी.एन. वानखेडे यांनी वरिष्ठांसह धामणगाव बढे पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी वन विभागास याबाबत माहिती दिली.