भरधाव बसची ट्रकला धडक

By Admin | Updated: April 10, 2015 23:38 IST2015-04-10T23:38:46+5:302015-04-10T23:38:46+5:30

बसमधील १३ प्रवासी जखमी; राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील घटना.

The bus carrying the truck | भरधाव बसची ट्रकला धडक

भरधाव बसची ट्रकला धडक

मलकापूर (जि. बुलडाणा): मलकापूरहून बर्‍हाणपूरकडे जाणार्‍या भरधाव एसटी बसने समोरील ट्रकला जबर धडक दिली. यामध्ये बसमधील १३ प्रवासी जखमी झाले. ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर धरणगावनजीक १0 एप्रिल रोजी दुपारी ४.१५ वाजताच्या सुमारास घडली. मलकापूर येथून मुक्ताईनगर आगाराची बस (क्रमांक एमएच १४-बीटी २७00) बर्‍हाणपुरकडे जात असताना धरणगावनजीक ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरील ट्रक (क्रमांक केए-२८बी-६६0९) वर आदळली. अपघाताची माहिती मिळताच मनसे जिल्हा उपाध्यक्ष गजानन ठोसर, हनुमान जगताप, शहर पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख, उपनिरीक्षक राहुल मोरे, हेडकॉन्स्टेबल संजय किनगे, शहर वाहतूक शाखेचे कॉन्स्टेबल नीलेश पुंडे, पंजाब पैठणे, मो. इश्ताक, सुनील बैनाडे, दिलीप तडवी आदींनी घटनास्थळी पोहोचून जखमींना उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात हलविले. अपघातामुळे दोन्ही बाजूंनी दोन-दोन किलोमीटरपर्यंत वाहतूक खोळंबली होती. अवघ्या १५ मिनिटांतच पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. घटना घडल्यानंतर ट्रकचा चालक व क्लीनर घटनास्थळाहून पसार झाले, तर बसचालक वानखेडे (रा.मुक्ताईनगर) यांनी शहर पोलिसांत धाव घेतली. यातील जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. घटनेनंतर एसटी महामंडळाचे अधिकारी, आगार व्यवस्थापक आदींनी उपजिल्हा रूग्णालयात धाव घेतली होती. अधिक तपास मलकापूर पोलीस करीत आहेत.

Web Title: The bus carrying the truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.