धामणगावबढे-मोताळा मार्गावर बस-दुचाकीचा अपघात; एक गंभीर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 01:41 AM2018-01-22T01:41:35+5:302018-01-22T01:42:25+5:30

धामणगावबढे : येथील बसस्थानकापासून काही अंतरावर धामणगावबढे-मोताळा रस्त्यावर एसटी बस व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन बुलडाणा तालुक्यातील  गुम्मी येथील एक जण गंभीर जखमी झाला आहे.  हा अपघात २१ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेदरम्यान घडला. 

Bus-bike accident on Dhamangaon-Bareilly-Motala road; A serious | धामणगावबढे-मोताळा मार्गावर बस-दुचाकीचा अपघात; एक गंभीर 

धामणगावबढे-मोताळा मार्गावर बस-दुचाकीचा अपघात; एक गंभीर 

Next
ठळक मुद्देबुलडाणा तालुक्यातील गुम्मी येथील एक जण गंभीर जखमी प्रकृती गंभीर असल्याने जखमीला बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले

लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगावबढे : येथील बसस्थानकापासून काही अंतरावर धामणगावबढे-मोताळा रस्त्यावर एसटी बस व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन बुलडाणा तालुक्यातील  गुम्मी येथील एक जण गंभीर जखमी झाला आहे.  हा अपघात २१ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेदरम्यान घडला. 
धामणगाव बढेवरून पहूर-बुलडाणा ही बुलडाणाकडे जाणारी बस (क्रमांक एमएच-१४-बीटी-१६४३) आणि  धामणगाव बढेकडे येणार्‍या एम.एच.२८ एम ५0९७ स्पेलंडर या दुचाकीमध्ये धडक झाली. या अपघातामधअये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर प्रथम धामणगाव बढे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने नंतर त्यास पुढील उपचारासाठी १0८ रुग्णवाहिकेद्वारे बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातामधील जखमीचे नाव मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. वृत्त लिहीपर्र्यंत पोलिसात गुन्हा दाखल नव्हता.

 

Web Title: Bus-bike accident on Dhamangaon-Bareilly-Motala road; A serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.