बस - ट्रक अपघातात ७ प्रवासी जखमी
By Admin | Updated: May 11, 2016 02:44 IST2016-05-11T02:44:53+5:302016-05-11T02:44:53+5:30
बुलडाणा-मलकापूर मार्गावरील घटना

बस - ट्रक अपघातात ७ प्रवासी जखमी
मोताळा (जि. बुलडाणा): बुलडाणा-मलकापूर मार्गावरील राजूर नजीक झालेल्या एस.टी. बस व ट्रकच्या अपघातात सात प्रवासी जखमी झाले. ही घटना १0 एप्रिल रोजी घडली. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी ट्रक व बस चालकावर गुन्हा दाखल केला आहे. मलकापूर ते औरंगाबाद बस क्रमांक एम. एच. ४0 एन. ९७0३ ही प्रवासी घेऊन मलकापूर येथून मोताळामार्गे बुलडाण्याकडे जात असताना राजूर ते मोहेगाव दरम्यान असलेल्या ढाब्यासमोर विटांनी भरलेला ट्रक (क्रमांक एम. एच. 0४ सीजी. ४७२२) रस्त्याच्या कडेला बंद अवस्थेत उभा होता. बस चालकाचे नियंत्रण सुटलनयाने उभ्या असलेल्या ट्रकवर बस आदळली. या अपघातात बसमधील देवीदास जवरे, शालीने जवरे, गोविंदा खराटे, शमशेरखाँ, महमद सलीम अधिक दोन असे ७ प्रवासी किरकोळ जखमी झाले.