हंसराज नगरातील शिक्षकाच्या घरी चोरी; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
By अनिल गवई | Updated: August 21, 2023 18:55 IST2023-08-21T18:55:22+5:302023-08-21T18:55:37+5:30
याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात भादंवि कलम ४५४,४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.

हंसराज नगरातील शिक्षकाच्या घरी चोरी; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
खामगाव: येथील हंसराज नगरातील एका शिक्षकाच्या बंद घरात चोरी करण्यात आली. ही घटना सोमवारी उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलीसांनी शिक्षकाच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत हंसराज रविंद्र मनोहर उपाध्याय यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, कामानिमित्त ते बाहेरगावी गेले होते. दरम््यान बंद घराचे दरवाजाचे कुलूप तोडुन चोरट्यांनी आत प्रवेश केला. कपाटातील जुने सोन्याचे मंगळसुत्र वजन अंदाजे 4 तोळे किंमती अंदाजे ४८००० रूपये, ५ तोळे चांदीचे पैजन व बिचवे किंमत ७५०० रूपये असा एकुण ५५५०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे नमूद केले. याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात भादंवि कलम ४५४,४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.