पेरणीच्या तोंडावर बैल बाजारात गर्दी!

By Admin | Updated: June 10, 2016 02:00 IST2016-06-10T02:00:24+5:302016-06-10T02:00:24+5:30

पेरणीसाठी पैशांची जुळवाजुळव; खामगावच्या बाजारात ६७५ बैल विक्रीला!

Bullocks rush in the face of sowing! | पेरणीच्या तोंडावर बैल बाजारात गर्दी!

पेरणीच्या तोंडावर बैल बाजारात गर्दी!

खामगाव (जि. बुलडाणा) : खरीप हंगामातील पेरणीचे काही दिवस उरले असताना यावर्षी पेरणीची सोय म्हणून शेतकर्‍यांनी पशुधन विक्रीला काढले आहे. खामगावच्या आठवडी बाजारात गुरुवारी तब्बल ६७५ बैल विक्रीला आले होते. यामधील ३४२ बैलांची खरेदी-विक्री झाली आहे.
मागील तीन वषार्ंपासून शेतकरी सतत दुष्काळाच्या छायेत वावरत आहे. शेतीमधून अपेक्षित उत्पन्न निघत नसल्याने शेतकरी पार आर्थिक संकटात सापडले आहेत. आर्थिक चक्रव्यूहातून शेतकरी निघण्याचा प्रयत्न करीत असले, तरी निसर्गाच्या अवकृपेने आतापर्यंंंत शक्य झाले नाही. कर्जाचे पुनर्गठन करून आणखी भार शेतकर्‍यांवर पडत आहे. अशा स्थितीत यावर्षी खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतकर्‍यांची धावपळ सुरू आहे. पेरणीची सोय म्हणून शेतकर्‍यांनी पशुधन विक्रीला काढले आहे. खामगाव येथील आठवडी बाजारात बैल विक्रीचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढले, पेरणीचे दिवस तोंडावर आले असताना गुरुवारी ६७५ बैल विक्रीला आणल्याची नोंद आहे.

Web Title: Bullocks rush in the face of sowing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.