बुलडाण्यात मिनीडोअर जळून खाक

By Admin | Updated: November 2, 2016 14:31 IST2016-11-02T14:31:52+5:302016-11-02T14:31:52+5:30

बुलडाण्यातील धाड येथील औरंगाबाद मार्गावरील प्रगत अ‍ॅटो सेंटरसमोर उभ्या असलेल्या मिनिडोअरला १ नोव्हेंबरच्या रात्री आग लागली.

The bullet hit the mini-dray | बुलडाण्यात मिनीडोअर जळून खाक

बुलडाण्यात मिनीडोअर जळून खाक

>ऑनलाइन लोकमत
धाड (बुलडाणा), दि. २ - औरंगाबाद मार्गावरील प्रगत अ‍ॅटो सेंटरसमोर उभ्या असलेल्या मिनिडोअरला १ नोव्हेंबरच्या रात्री आग लागली. यामध्ये मिनिडोअर जळून खाक झाली. धाड येथील औरंगाबाद मार्गावरील प्रगत अ‍ॅग्रो सेंटर समोरील मोकळ्या जागेत
परमेश्वर तायडे रा. जामठी यांनी एम. एच. २८ आर ३०७९ क्रमांकाचा मिनीडोअर उभी केली होती.  १ नोव्हेंबरला रात्रीच्या सुमारास अचानक वाहनाने पेट घेतला. यामध्ये मिनिडोअर जळून खाक झाली. तायडे यांचे २ लाख १० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. या संदर्भात त्यांनी धाड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Web Title: The bullet hit the mini-dray