शेगावात पुन्हा बुलडोजर चालला
By Admin | Updated: December 8, 2014 23:57 IST2014-12-08T23:57:38+5:302014-12-08T23:57:38+5:30
उच्च न्यायालयाचा आदेश : १00 पेक्षा जस्त अतिक्रमणे हटविली.

शेगावात पुन्हा बुलडोजर चालला
शेगाव (बुलडाणा): वेळोवेळी अतिक्रमण काढूनही रेल्वे स्टेशन ते श्री संत गजानन महाराज मंदिर रस्त्यावर होणार्या अतिक्रमणाबाबत उच्च न्यायालयाने नगरपालिकेची कानउघाडणी केल्यानंतर आज सोमवारी शेगावातील अतिक्रमणांवर पुन्हा बुलडोजर चालला. यामध्ये १00 च्या वर अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली.
शेगाव शहरातील विकास आराखडा अंतर्गत झालेल्या कामांवर व्यवसायिकांकडून वेळोवेळी अतिक्रमणे केल्या जातात. शेगाव नगरपालिकेने यासाठी अनेक वेळा अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविल्यानंतरही दुसर्या दिवशी स्थिती ह्यजैसे थेह्ण होत असल्याची बाब नागपूर उच्च न्यायालयाला निदर्शनास आली. याबाबत न्यायालयाने शेगाव नगरपालिकेची कानउघाडणी करीत शहरातील रेल्वे स्थानक ते श्री गजानन महाराज मंदिर परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमणे तत्काळ पोलीस बंदोबस्तात काढून टाकावे, असे आदेश ३ डिसेंबर रोजी पारित करून एका आठवड्यात केलेल्या कारवाईच्या अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज सोमवारी नगरपालिका, महसूल प्रशासन, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, भूमी अभिलेख कार्यालय यांनी संयुक्तरित्या मोहीम राबवून १00 च्यावर अतिक्रमणे जेसीबीच्या साहय़ाने जमीनदोस्त करण्यात आली.