शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

बुलडाणा मतदारसंघात ऐनवेळी उमेदवारी बदलल्याने रंगत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2019 4:13 PM

वंचित बहुजन आघाडीने वेगळ्या उमेदवाराला घेऊन एंट्री मारल्याने निवडणुकीत रंगत आली आहे.

- योगेश देऊळकार  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक लढतीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. वंचित बहुजन आघाडीने ऐनवेळी शिवसेनेचे माजी आमदार विजयराज शिंदे यांना उमेदवारी दिली. याआधी ते अपक्ष लढण्याची चर्चा होती. परंतु वंचित बहुजन आघाडीने वेगळ्या उमेदवाराला घेऊन एंट्री मारल्याने निवडणुकीत रंगत आली आहे.बुलडाणा विधानसभा मतदारसंघात आता सर्वच पक्षाचे उमेदवार जाहीर झाले आहेत. काँग्रेसकडून विद्यमान आमदार हर्षवर्धन सपकाळ रिंंगणात आहेत. शिवसेनेकडून संजय गायकवाड यांना संधी देण्यात आली आहे. मतदारसंघ भाजपच्या वाट्याला न आल्याने योगेंद्र गोडे यांनी नाराज होऊन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तर बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे तीन वेळा आमदार राहिलेले शिवसेनेचे माजी आमदार विजयराज शिंदे यांना पक्षाने उमेदवारीसाठी नाकारले. यामुळे गायकवाड यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून ते बंडाचे हत्यार हाती घेण्याच्या तयारीत होते. सुरूवातीला ते अपक्ष लढणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याच्या अगोदरच्या दिवशी ते शिवसेनेला जय महाराष्ट्र करून वंचितमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यानुसार त्यांनी ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी एक बैठक घेऊन शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश घेतल्याचे जाहीर करण्यात आले व उमेदवारी अर्जही दाखल केला.विजयराज शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर निवडणूक रिंंगणात उडी घेतल्याने प्रारंभी तिरंगी वाटणारी ही लढत चौरंगी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. युतीच्या अधिकृत उमेदवारासह गत वेळीच्या विधानसभा निवडणुकीचेच उमेदवार सध्या रिंंगणात असले तरी त्यातुलनेत आता परिस्थिती भिन्न आहे. युतीचेच दोन बंडखोर उमेदवार आता निवडणूक लढणार असल्याने युतीच्या मतांचे विभाजन होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यास दोन दिवसांचा अवधी आहे. प्रत्यक्ष लढतीचे चित्र तेव्हाच स्पष्ट होईल. परंतू सध्यातरी येथे चौरंगी लढतीचे संकेत मिळत आहेत.उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो त्याला कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची साथ महत्त्वाची असते. मात्र उमेदवारांच्या पक्ष बदलाने त्यांच्यासोबत असलेले कार्यकर्ते मात्र संभ्रमात सापडले आहेत. कोणाची साथ द्यायची आणि कोणाला नाकारायचे हे ठरविताना त्यांची आता चांगलीच कसोटी लागताना दिसून येत आहे.

काळेंच्या पदरी निराशासुरूवातीला वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारीसाठी मोताळा तालुक्यातील तेजल काळे यांचे नाव समोर करण्यात आले होते. मात्र वेळेवर त्यांना पक्षाने ‘नारळ’ देण्यात आला असून त्यांच्या जागी शिवसेनेचे माजी आमदार विजयराज शिंदे यांना संधी देण्यात आल्याने त्यांच्या पदरात मात्र निराशा पडली असल्याचे बोलल्या जात आहे.

एआयएमआयएमच्या उमेदवारावरही नजरालोकसभा निवडणुकीमध्ये एआयएमआयएम वंचित बहुजन आघाडीमध्ये समाविष्ट होते. बुलडाणा लोकसभा मतदारसंघात त्यांनी उमेदवारही दिला होता. मात्र विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपात झालेल्या मतभेदाच्या कारणावरून एआएमआयएमने विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एआयएमआयएमने वंचित बहुजन आघाडीमधूनच आयात केलेल्या मोहम्मद सज्जाद यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्यामुळे होणारे मतविभाजन हे कोणाच्या पथ्यावर पडणारे आहे हे येणारा काळच स्पष्ट करेल. मात्र त्यासाठी किमान सात आॅक्टोबर या अर्जमागे घेण्याच्या तारखेची वाट पहावी लागणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019buldhana-acबुलढाणा